शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध संघटना करताहेत नियोजनबद्ध, प्रभावी कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 3:02 PM

हल्ली जवळपास प्रत्येक जण सोशल मीडियाच्या प्रभावाखाली आहे.

ठळक मुद्देकोरोना इफेक्टविविध संघटना कमालीच्या अ‍ॅक्टीव्ह

डिगंबर महालेअमळनेर, जि.जळगाव : हल्लीचे युग नेमके कशाचे आहे? कोणत्या फॅक्टरचा सर्वाधिक बोलबाला आहे, याबाबत समाजमनाची जाण असणाऱ्यांमध्ये मतभिन्नता आहे. मात्र, हल्ली जवळपास प्रत्येक जण सोशल मीडियाच्या प्रभावाखाली आहे. यावर सर्वांचेच मतैक्य आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक या सर्वच क्षेत्रात हल्ली सोशल मीडियाचा सर्रास वापर सुरू आहे. या सर्वच क्षेत्रात नियोजनापासून ते मार्केटिंगपर्यंत सोशल मीडियाला आता पर्याय राहिलेला नाही. किंबहुना जो सोशल मीडियाचा सढळ हाताने आणि चपखलरित्या जितका जास्तीत जास्त वापर करेल तितकी त्याची सरशी होईल, हीच वस्तुस्थिती आहे.विद्यार्थी संघटना म्हटल्या म्हणजे सळसळते चैतन्य आणि नित्यनावीण्याच्या वलयात राहणाºया असतात. त्यांच्यात सोशल मीडियाचे स्थान प्राणवायूपेक्षा फारसे कमी नसते. सर्व प्रकारच्या चळवळी आणि उपक्रमांना सर्वदूर व्यापकतेने सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहचविण्यात यांचा हातखंडा आहे. त्यातही अ.भा.वि.प.सारख्या केडर बेस संघटनेचे तर विचारायलाच नको. प्रसंग आणि स्थिती कोणतीही असो तिला सोशल मीडियाच्या साहाय्याने कसे हाताळावे यात अभाविप अन्य संघटनांच्या तुलनेने निश्चित उजवी आहे. लॉकडाऊनच्या काळातही फेसबुकच्या माध्यमातून थेट लाईव्ह कार्यक्रमांपासून ते कनेक्टिव्हिटीपर्यंत कार्यक्रम व उपक्रम ते लिलया राबवित आहेत.फेसबुकसह व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम, ब्लॉग आदींच्या माध्यमातूनही कोरोनासारख्या स्थितीत संघटना कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. कोरोनाला संकट किंवा आक्रमण न मानता त्यास सोशल मीडियाच्या माध्यमातून आव्हान व संधीस्वरूप रूप देण्यात अभाविप चांगल्याप्रकारे यशस्वी झाली आहे. नवीन सदस्यांना जोडणे आणि त्यांना जुन्या सदस्यांसह बांधून ठेवणे यातही अभाविप यशस्वी ठरली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सदस्यांना दिलासा देणे, मार्गदर्शन करणे, मदत करणे, वंचित घटकांसाठी मदतीचे अनेकविध उपक्रम राबविणे, त्याचा पद्धतशीर डाटा मेंटेन करणे हे सारे काही सोशल मीडियाच्या साहाय्याने हाताळण्यात संघटना खूप यशस्वी ठरली आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला रूढी व परंपरा प्रिय असल्या तरी त्यांना संघटन मजबूत, सुनियोजित व सुनियंंित्रत करण्यासाठी सोशल मीडियासारख्या अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्यात कोणतेही वावडे नाही. मायक्रोप्लॅनिंग बेस असलेल्या संघाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी मदतकार्य करण्यासाठी सोशल मीडियाचा निपुणतेने वापर केला आहे व करत आहे. कोरोनामुळे संघाच्या शाखा व उन्हाळी प्रशिक्षण वर्गांना निर्बंध आले आहेत. त्यामुळे स्वयंसेवकातील विविधांगी बंध घट्ट करण्यासाठी संघ सोशल मीडियाचा पध्दतशीर वापर करीत आहे.अंधश्रद्धा निर्र्मूलन समितीचे कामही व्यापक आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचेही मोठे नेटवर्क आहे. समितीला सर्वार्थाने मोठी व सशक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धेचे पेव फुटू नये तसेच त्यावर उपाययोजना स्वरूप कार्यकर्त्यांना माहिती देण्यासाठी, मदतकार्य उभारण्यासाठी समिती सोशल मीडियाचा उत्तम वापर करीत आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाAmalnerअमळनेर