शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

जळगावमध्ये प्रथमच महाएकांकिका महोत्सवाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 9:43 PM

महाराष्टÑ शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनायामार्फत जिल्ह्यातील नाट्यकर्मींसाठी ४ व ५ मार्च रोजी महाएकांकिका महोत्सवाचे आयोजन ला.ना.सार्वजनिक विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात सायंकाळी ७ वाजता करण्यात आले आहे.

ठळक मुद्देराज्यस्तरावरील नामांकित स्पर्धेतील सहा एकांकिका होणार सादर४ व ५ मार्च रोजी महाएकांकिका महोत्सवाचे आयोजनमहाविद्यालयीन युवक-युवतींसाठी नाट्य प्रशिक्षण

आॅनलाईन लोकमत

जळगाव,दि.२८- महाराष्टÑ शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनायामार्फत जिल्ह्यातील नाट्यकर्मींसाठी ४ व ५ मार्च रोजी महाएकांकिका महोत्सवाचे आयोजन ला.ना.सार्वजनिक विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात सायंकाळी ७ वाजता करण्यात आले आहे. या महोत्सवात राज्यस्तरावरील नामांकित एकांकिा स्पर्धेमध्ये पारितोषिक प्राप्त अशा सहा एकांकिका सादर करण्यात येणार आहेत.

शहरात गेल्या काही वर्षांपासून नाट्य महोत्सव, पुरुषोत्तम करंडक, बालराज्य नाट्य स्पर्धांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने महाएकांकि का महोत्सवासाठी शहराची निवड केली आहे. दरम्यान, या महोत्सवानिमित्त ४  व ५ मार्च रोजी सकाळी १० वाजता जिल्ह्यातील महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी नाट्य प्रशिक्षण पोलीस मुख्यालयाच्या मंगलम सभागृहात करण्यात आले आहे. यावेळी नाट्य व चित्रपट क्षेत्रातील  कलावंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

या एकांकिका होणार सादरएकांकिका  -  लेखक -  संस्था१.माणसं - रायबा गजमल - नृत्य विभाग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद२. कुरुप - रुपेश पवार - धनवटे नॅशनल कॉलेज, नागपुर३. समथींगच्या सावल्या - श्रीपाद देशपांडे - मू.जे.महाविद्यालय, जळगाव४. नथींग टु से - प्रसाद दाणे - गावंडे नवोदिता, चंद्रपुर५. निर्वासित - स्वप्नील जाधव - सिडनहॅम कॉलेज, मुंबई६.अनुरागम - वैभव देशमुख - स्वर्गीय छगनलाल मुंजीभाई

कोट..जळगाव शहरात पहिल्यांदाच महाएकांकिका महोत्सवाचे आयोजन  करण्यात येत आहे. या महोत्सवामुळे शहरातील नाट्य रसिकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. या एकांकिका महोत्सवाचा  युवा कलावंतासह नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा.-विनोद ढगे, समन्वयक,महाएकांकिका महोत्सव