जळगाव - जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव कार्यालयातर्फे 25 ते 27 ऑगस्ट, 2020 या कालावधीत कोविड विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता ऑनलाईन पध्दतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.याअनुषंगाने जळगाव जिल्हा व जिल्ह्याबाहेरील आस्थापना, कंपन्यांमधील विविध प्रकारच्या रिक्तपदांव्दारे मोठी सुवर्णसंधी जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी देऊ केली आहे. या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडुन www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर विविध शैक्षणिक पात्रतेची एकूण 310 रिक्तपदे अधिसुचित करण्यात आली आहेत. यासाठी विभागाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे मॅचिंग होणा-या किंवा ऑनलाईन अप्लाय केलेल्या उमेदवारांच्या मुलाखतींकरीत जास्तीत जास्त उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलला लॉग-इन करुन लाभ घ्यावा.याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी (सकाळी 9.45 ते संध्या 6.15) या वेळेत कार्यालयाशी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0257-2239605 वर संपर्क साधावा. असे श्रीमती अनिसा तडवी, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 6:27 PM