लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : तालुक्यात कोरोनामुळे होणारे मृत्यूचे तांडव सुरूच असून रविवारी तालुक्यातील आठ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. शनिवारी ११ जणांचे मृत्यू झाले होते. त्यामुळे अमळनेरात दोन दिवसात १९ जणांचा मृत्यू झाला आहे.
दुसरीकडे ५७७ चाचण्यांपैकी ४२ पॉझिटिव्ह आले असून आजची टक्केवारी ९.२३ टक्के आहे. मृतांमध्ये दिलीप अमृत चौधरी (अयोध्यानगर बंगाली फाईल), अभिमन्यू नारायण पाटील (दत्त हौसिंग सोसायटी), भालचंद्र भिकचंद विसपुते ( शिरुडनाका), दिलीप विक्रम पाटील (पिंपळे खुर्द ता. अमळनेर) ,भास्कर पंडित सोनवणे (ड्रीमसीटी) , राजू मुनिर फतरोड (हेडावे रोड) , विशाल संतोष संदानशीव (ताडेपुरा) , भीमराव बाबुराव पाटील (द्वारका नगर पिंपळे रोड) यांचा समावेश आहे. या सर्वांना विविध सरकारी , खाजगी आणि जळगाव धुळे येथील खाजगी रुगणल्यात दाखल करण्यात आले होते. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अमळनेर पैलाड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. याव्यतिरिक्त ग्रामीण भागातील लोक आपला आजार लक्षणे लपवत असून त्यांच्या मृत्यूची नोंद कळत नसल्याने रोज नेमके किती मृत्यू होत आहेत याबाबत संभ्रम झाला आहे.
रविवारी आरोग्य विभागातर्फे २५४ चाचण्या ग्रामीण भागात करण्यात आल्या त्यात १२ पॉझिटिव्ह तर शहरी भागात ३२३ चाचण्या करण्यात आल्या त्यात ४२जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.