मुंबई इंडियन्सने आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले आहे की, मुंबई इंडियन्सच्या संघातील सर्व विदेशी सदस्य आपापल्या मूळ स्थानावर पोहोचले आहेत. आता सर्वजण सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करत आहेत. आणि घरीच रहा, सुरक्षित रहा. स्पर्धेला दि. ४ मे रोजी स्थगित करण्यात आले. त्यानंतर संघासोबत असलेल्या १४ विदेशी सदस्यांनी भारत सोडला. किरोन पोलार्ड त्रिनीदादला पोहचला आहे, तर दक्षिण आफ्रिकचे क्विंटन डीकॉक आणि मार्को जॉन्सन जोहान्सबर्गला पोहचले आहेत. ऑस्ट्रेलियन खेळाडू क्रिस लीन आणि नॅथन कुल्टरनाईल आणि मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांच्यासोबत सहयोगी सदस्य एका चार्टर्ड विमानाने मालदीवला गेले आहेत. ते तेथे १४ दिवस विलगीकरणात राहतील.
न्यूझीलंडचे ॲडम मिल्ने, जीमी निशाम, ट्रेंट बोल्ट आणि सहयोगी सदस्य चार्टर्ड विमानाने ऑकलंडला पोहचले आहेत.