किरण चौधरीरावेर, जि.जळगाव : तालुक्यातील ४१ कोरोनाबाधित गावांपैकी खानापूर, निंभोरासीम, ऐनपूर, कुसूंबा बु ।।, रमजीपूर, कुंभारखेडा, मस्कावद बु ।।, भोकरी, तामसवाडी, सावखेडा खु, तांदलवाडी, मस्कावद सीम, वाघोड, लोहारा, वाघोदा खुर्द ।।, कर्जोद व निंबोल ही १७ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. त्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला असून, ७२ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील यांनी दिली. रावेर व सावदा शहरासह तालुक्यातील ४१ गावात ४३९ रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत. त्यापैकी खानापूर, निंभोरासीम, ऐनपूर, कुसूंबा बु ।।, रमजीपूर, कुंभारखेडा, मस्कावद बु ।।, भोकरी, तामसवाडी, सावखेडा खु, तांदलवाडी, मस्कावद सीम, वाघोड, लोहारा, वाघोदा खुर्द ।।, कर्जोद व निंबोल या १७ गावातील ७२ रूग्णांनी कोरोनावर मात केल्याने उभय गावे कोरोनामुक्त झाले आहेत. या गावांमधील आजपावेतो आठ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. ही गावे कोरोनामुक्त झाली असली तरी त्या काही गावांमधील प्रतिबंधित क्षेत्रांची ३८ दिवसांची कालमर्यादा संपली नसल्याने प्रतिबंधित क्षेत्र अद्याप कायम आहेत. दरम्यान, चिनावल, विवरे बु, रसलपूर, अहिरवाडी, केर्हाळे बु ।।, पाल, गाते, खिरोदा, उदळी, बु ।।, उटखेडा, कोचूर बु ।। व बक्षीपूर येथील एखाद दोन रूग्ण औषधोपचार घेत असून ८७ रूग्ण उभय गावातूनही कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान वाघोदा बु।। येथील दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असून ११ जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर १३ जण औषधोपचार घेत आहेत पिंप्री येथी १५ कोरोना बाधितांपैकी ७ जण कोरोनामुक्त झााले असून आठ जण कोविड केअर सेंटरला औषधोपचार घेत आहेत.दरम्यान, खिर्डी बु।।, अटवाडे, खिरवड, निंंभोरा बु ।।, सुनोदा, सुदगाव, नेहता व अजंदे येथील ३१ जण रावेर, फैजपूर, भुसावळ व जळगाव येथील कोरोना रुग्णालयात औषधोपचार घेत आहेत तर २० जण कोरोना मुक्त झाले आहेत. दरम्यान, रावेर व सावदा शहरातील १९५ कोरोना बाधित रुग्णांपैकी १५ जणांचा मृत्यू झाला असून ९९ जण कोरोना मुक्त झाले आहेत तर ८१ जण कोरोनावर औषधोपचार घेत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील यांनी दिली आहे. खानापूरला खबरदारी म्हणून पुन्हा जनता कर्फ्यूतालुक्यातील खानापूर येथे २५ रूग्ण कोरोना बाधित निघाल्यानंतर तीन जणांचा मृत्यू तर २२ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. मात्र शेवटच्या रूग्णानंतर आता ११ दिवस झाले तरी एकही रूग्ण आढळून आला नसल्याने गाव कोरोनामुक्त झाले आहे. मात्र तरीही ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीने पुन्हा शेतकरी व शेतमजूर वगळता तीन दिवसांचा जनता कर्फ्यू पुकारला आहे. ग्रामस्थांच्या आरोग्याच्या हितासाठी एकदिलाने जनता कर्फ्यू दुसर्यांदा अंमलात आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने एकच कौतुक होत आहे.
रावेर तालुक्यातील ४१ पैकी १७ गावे झाली कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 11:23 PM
रावेर तालुक्यातील ४१ पैकी १७ गावे कोरोनामुक्त झाली आहेत.
ठळक मुद्दे१७ गावातील ९ जणांचा झाला मृत्यू७२ जणांनी केली कोरोनावर मात