ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 28 - ग्राहक सेवा केंद्राच्या नावाखाली ग्राहकांकडून स्वीकारलेले लाखो रुपये त्यांच्या बॅँक खात्यात जमा न करता त्याची हेराफेरी केल्याचा प्रकार जिल्हा क्रीडा संकुलातील कृष्णा सायबर कॅफेत सोमवारी उघडकीस आला. पोलिसांनी हे कॅफे सील केले असून कॅफे चालक देवेंद्र भालचंद्र धांडे (वय 31, रा. सिंधू नगर, कालिंका माता चौक, जळगाव) याला ताब्यात घेतले आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलातील कृष्णा सायबर कॅफेत स्टेट बॅँकेचे मान्यताकृत ग्राहक सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे. मोहीत जैन यांच्या मालकीचे हे केंद्र असून त्यांच्याकडून देवेंद्र धांडे याने आठ दिवसापूर्वीच भाडे कराराने चालवायला घेतले आहे. या केंद्रात 20 हजार रुपयांच्या आत रक्कम काढणे व जमा करण्याची सुविधा उपलब्ध आहे. शनिवारी बॅँकाना सुटी असल्याने 25 ते 30 ग्राहकांनी या केंद्रात येऊन धांडे याच्याकडे पैसे दिले. धांडे याने ते पैसे घेतल्यानंतर ग्राहकांना पावत्याही दिल्या, मात्र सोमवार्पयत हे पैसे संबंधित व्यक्तींच्या खात्यात जमा झालेच नाहीत.पोलीस ठाण्यात मध्यस्थीमोहीत जैन यांच्या दुकानात अन्य व्यवसायासाठी भागीदार असलेले ज्ञानेश्वर राणा यांनी पोलीस ठाण्यात आलेल्या चार तक्रारदारांचे 46 हजार रुपये भरण्याची तयारी दर्शविली. सकाळीही त्यांनी काही तरुणांचे 32 हजार रुपये भरले होते. या प्रकरणाशी संबंध नसताना फक्त माणुसकी म्हणून त्यांनी हा पुढाकार घेतला. त्यामुळे रात्री या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नाही. मंगळवारी अन्य लोकांचे पैसे परत केले नाहीत तर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.या ग्राहकांचा संतापमुकेश वर्मा 12 हजार 500, निलेश वाघ दीड हजार, राहूल संजय ढोले सात हजार व प्रमोद पाटील 25 हजार असे चार जणांचे 46 हजार रुपये धांडे याने घेतले होते. हे चारच तरुण सायंकाळी हजर होते तर अन्य तरुण बाहेरगावचे असल्याने निघून गेले होते.याशिवाय एका जणाचे 1 लाख 80 हजार रुपये घेतले असून अन्य 20 ते 22 जणांचे दोन हजारापासून तर 25 हजारार्पयत रक्कम आहे. यापैकी काही ग्राहकांनी तक्रार केल्याने पोलीस तपास करीत आहेत. अन् ग्राहकांचा संताप झाला.धांडे याने घेतलेले पैसे जमा होत नसल्याने ग्राहकांनी शनिवारीच त्याला विचारणा केली. सॉफ्टवेअरची अडचण आहे असे सांगून तो वेळ मारुन नेत होता. शनिवारी त्याने सायंकाळर्पयत तांत्रिक कारण देत दिशाभूल केली. रविवारी दुकान बंद असल्याने ग्राहकांनी सोमवारी दुकानात येऊन धांडे याला जाब विचारत पैसे परत मागितले, मात्र हे पैसे मोहीत जैन यांच्याकडे असल्याचे सांगून त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे ग्राहकांचा संताप झाला. त्यातील राहूल ढोले या तरुणाने स्थानिक गुन्हे शाखेच्या सायबर सेलकडे तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांनी खात्री करण्यासाठी उपनिरीक्षक अंगत नेमाने, श्रीकृष्ण पटवर्धन, संदीप पाटील व जयंत चौधरी यांचे पथक फसवणूक झालेल्या तरुणसोबत पाठविले व दुकान सीलची कारवाई केली. अन् दुकान केले सीलपोलिसांनी सायबर कॅफेत येऊन चौकशी केली असता देवेंद्र धांडे हा दिशाभूल करणारी उत्तरे पोलिसांना देत होता. ग्राहकांची जमा झालेली रक्कम मोहीत जैन हे घेऊन गेल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी तेथूनच जैन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे दुकानाची तपासणी करुन त्यातील पावत्या, ग्राहकांचे बॅँकांचे पासबुक आदी वस्तू जमा करुन दुकानाला सील लावले. मोहीत जैन यांच्या मालकीचे दुसरे दुकानही सील केले. या दुकानातून मात्र असा व्यवहार झालेला नाही. दुकान व ग्राहक सेवा केंद्र माङो असले तरी मी हे दुकान देवेंद्र धांडे याला भाडय़ाने दिलेले आहे. त्यामुळे लोकांची फसवणूक झाल्याशी माझा काहीही संबंध नाही. सध्या मी राजस्थानात आहे. -मोहीत जैन, दुकानमालक
ग्राहकांचे पैसे घेतले आहेत, मात्र ते त्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. आमच्या डिस्ट्रीब्युटर्सकडे ही रक्कम भरली आहे, परंतु ती रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली की नाही हे तांत्रिक कारणामुळे स्पष्ट झालेले नाही.- देवेंद्र धांडे, दुकानचालक