९ तालुक्यांमध्य कोरेानाला सुटी
जळगाव : रविवारी जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. कोरोनाला सुटी असल्याचे चित्र होते. यात जळगाव ग्रामीण, पाचोरा, बोदवड, मुक्ताईनगर, चाळीसगाव, पारोळा, जामनेर, भडगाव, अमळनेर या तालुक्यांचा समावेश आहे. कोरोना कमी होत असल्याचे चित्र अनेक तालुक्यांमध्ये दिसत आहे.
रस्त्यांचे तीन तेरा
जळगाव : शहरातील अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनिय अवस्था झाली असून नेरी नाका तो पांडे चौक हा अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या रस्त्यावर वाहतूक कोंडीचेही चित्र कायम असते. रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे. अन्य रस्त्यांचीही तीच परिस्थिती आहे.
रंगकाम पूर्णत्वाकडे
जळगाव :शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील मुख्य इमारतीच्या परिसरातील भींतीवरही आकर्षक चित्र रेखाटले जात असून हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे परिसर सुशोभीत झाला आहे. गेल्या महिनाभरापासून यामागे यंत्रणा कार्यरत आहे. यात रुग्णालयाचे कर्मचारीही सहकार्य करीत असल्याचे चित्र आहे.
माघारीकडे लक्ष
जळगाव : जिल्ह्यातील ७८३ ग्रमांपचयतींच्या निवडणुका होत असून सोमवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत असून निवडणुकीचे चित्रस्पष्ट होणार आहे. त्यामुळे या माघारींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यात अनेक मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे सोमवारी नेमके काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लसीकरणाची वाट
जळगाव : जिल्ह्यात लसीकरणाबाबतचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून लस आल्यानंतर ही कार्यवाही करण्याचे प्रशासनाने नियोजन केले आहे. यासाठी किती कर्मचारी लागतील याचाही आढावा प्रशासनाने घेतला असून लवकरच हे लसीकरणाचे काम सुरू होणार असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील यंत्रणा त्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले जात आहे.