हरताळे, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील पारंपरिक ओळखली जाणारी लोककला ओवी गायन संमेलन मोठ्या उत्साहात झाले. मध्य प्रदेशासह महाराष्ट्रातील सुमारे २५ गावातील ओवी गायन कलावंतांनी येथे संमेलनात सहभागी होऊन या पारंपरिक कलेला उजाळा दिला. मंगळवारी सायंकाळी सात ते दहा या कालावधीत हे संमेलन उत्साहात पार पडले.लोककलेचे महत्त्व आजच्या युगात तरुणांनी अंगीकरून पारंपरिक पद्धतीने कला जिवंत ठेवावी व ओवीच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचे जतन करावे या हेतूने येथे हे ओवी संमेलन भरवण्यात आले होते.दरवर्षी हे संमेलन फिरते असते. येथे झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष रघुनाथ पाटील वखारी, जि.बºहाणपूर होते. हरताळे येथील पंचरंगी ओवी मंडळाच्यावतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक मंडळाने आपल्या ओवीतून जनजागृती केली. विनामूल्य ओवी गायन करून समाज प्रबोधन केले जाते. भागवत महाजन, दसनूर, रामदास पाटील, बंभाळे चांगदेव, मुजलवाडी, पूर्णाड, जळगाव, मुक्ताईनगर आदी गावातील मंडळांनी ओवी कला सादर केली.यशस्वितेसाठी पंचरंगी ओवी मंडळाचे अध्यक्ष किसन चव्हाण, ईश्वर कापसे, भास्कर पाटील, बाळू कोळी, गजानन हिवरखेडे, संतोष ठाकूर दीपक सनान्से आदिंनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक सेवानिवृत्त प्रा.सीताराम चौरे यांनी, तर सूत्रसंचालन प्रदीप काळे यांनी केले.
मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे येथे ओवी गायन संमेलन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 4:38 PM
हरताळे, ता. मुक्ताईनगर , जि.जळगाव : विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील पारंपरिक ओळखली जाणारी लोककला ओवी गायन संमेलन ...
ठळक मुद्दे२५ गावांच्या मंडळांचा सहभागपारंपरिक लोककलेला आजही महत्त्व कला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न