डी.बी.पाटीलयावल, जि.जळगाव : तालुक्यातील डांभुर्णी ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील पहिल्या आॅक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनचे उद्घाटन शनिवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.डांभुर्णी आरोग्य उपकेंद्रात हे मशीन बसविण्यात आले आहे. यासाठी दोन आॅक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन सेट देण्यात आले आहेत. आॅक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनला आॅक्सिजन सिलिंडरची आवश्यकता भासत नाही. वातावरणातील आॅक्सिजन या मशिनच्या माध्यमातून थेट रुग्णास पुरविला जातो. जिल्ह्यातील डांभुर्णी ही पहिली ग्रामपंचायत आहे की, ग्रामपंचायतीच्या सहकार्याने उपकेंद्र आॅक्सिजन युक्त झाले आहे. जिल्ह्यात हा एकमेव प्रयोग असल्याचे सरपंच तथा सरपंच जिल्हा संघटनेचे अध्यक्ष पुरूजीत चौधरी यांनी सांंिगतले. यामुळे गावासह परिसरातील रुग्णास तातडीने आॅक्सिजन देता येवून पुढील अनर्थ टळेल, असे त्यांनी सांगितले.याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.काय आहे? आॅक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनआॅक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन म्हणजे वातावरणातील केवळ आॅक्सिजन वायूचा साठा करून त्याचा पुरवठा करणारी मशीन. वातावरणात आॅक्सिजन वायूव्यतिरिक्त नायट्रोजन, कार्बन डाय आॅक्साईड व अन्य घटक असतात. मात्र या मशीनच्या सहाय्याने केवळ आॅक्सिजन वायूचा साठा होतो. जेव्हा रुग्णास आॅक्सिजनची अत्यंत आवश्यकता असते आणि ऐन वेळेवर त्यास आॅक्सिजन मिळावा म्हणून घरगुती वापरासाठी तसेच लहान दवाखान्यात हा संच उपयोगी पडतो. जिल्ह्यातील हे पहिले मशीन असेल, असे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी सांगितले.
यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे आॅक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 5:07 PM
डांभुर्णी ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील पहिल्या आॅक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनचे उद्घाटन शनिवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
ठळक मुद्देजिल्ह्यातील पहिला प्रयोग