२ : तिसरी लाट जिल्ह्यात आल्यास दुसऱ्या लाटेत दिवसाला जेवढा ऑक्सिजन लागत होता त्याच्या तिपटीने ऑक्सिजनचा साठा असावा, असे आदेश आहेत. त्या तुलनेत त्यापेक्षा अधिक ऑक्सिजन निर्मिती होईल, असे खासगीत आणि शासकीय यंत्रणेत २५ प्रकल्प उभारले जात आहेत. त्यांचे काम पूर्ण झाले आहे. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २० केएल क्षमतेचा आणखी एक टँक उभारला जात आहे. शिवाय पीएम केअरचा एक प्रकल्प पूर्ण झाला आहे. यातून दिवसाला २५०० जम्बो सिलिंडर ऑक्सिजन निर्मिती होणार आहे.
३ तिसरी लाट आल्यानंतर शासकीय यंत्रणेत १४ हजार रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे. यात बेड वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्यातच बालकांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जात आहे.
४ दुसऱ्या लाटेत दिवसाला ३५ ते ५० टन ऑक्सिजनची मागणी होती. त्यादृष्टीने मोहाडी रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णवाढ झाल्यानंतरही २४ तास पुरेल इतका ऑक्सिजन साठा आहे.