साक्री : पांझरा-कान सहकारी साखर कारखान्याची किंमत 32 कोटींवरून 19 कोटी 85 लाखांर्पयत कमी करूनही शुक्रवारी पुन्हा एकदा हा कारखाना खरेदीसाठी टेंडर भरण्यातही कोणी रस दाखवला नाही. त्यामुळे कारखाना सुरू होण्याची आशा पुन्हा एकदा मावळली आहे. पांझरा-कान सहकारी साखर कारखान्यावर शिखर बँकेचे 22 कोटींचे कर्ज आहे. तसेच कामगारांचे 16 कोटींचे घेणे आहे. त्याच्या वसुलीसाठी या आधी शिखर बँकेने सुरुवातीला कारखान्याची किंमत 32 कोटी लावली होती, परंतु त्याला प्रतिसाद न मिळाल्यावर सहा महिन्यांपूर्वी कारखाना विक्रीसाठी 28 कोटी 91 लाखांचे विक्रीचे टेंडर काढले होते. परंतु बँकेच्या अटी व शर्तीमुळे पुन्हा कोणीही कारखाना खरेदी करण्यासाठी पुढे आले नाही. त्यानंतर बँकेने कारखान्याची किंमत आणखी कमी करून आता 19 कोटी 85 लाखांचे टेंडर काढले होते. परंतु ते टेंडरसुद्धा कोणीच भरले नसल्याची खात्रीलायक माहिती आहे. कारखाना सुरू होणार असेल किंवा विक्री होत असेल तर कामगार तडजोड करण्यास तयार आहेत, परंतु शिखर बँकेच्या धोरणामुळे कारखान्याची विक्री होत नसल्याची परिस्थिती आहे.
‘पांझरा-कान’ला खरेदीदार मिळेना
By admin | Published: January 30, 2016 12:32 AM