सागर दुबे‘पबजी’ या आॅनलाईन गेमचे अक्षरक्ष: तरूणाईसोबतच लहान मुलांना याड लागलयं़ दिवस-रात्र तरूण मंडळी या गेमच्या विळख्यात अडकल्यामुळे पालकांच्या डोकेदुखी बनली आहे़ महाविद्यालयाचा कट्टा असो किंवा गल्ली बोळ, या आपल्या वैयक्तिक खोलीत लहान मुलांसह महाविद्यालयीन तरुण तासं-तास हा गेम खेळतानाचे चित्र बघायला मिळत आहे़सोशल मीडीयाचा वापर आज मोठ्या प्रमाणावा होताना दिसून येत आहे़ सोशल मीडीयासोबतच आॅनलाईन गेमचीही तरूणाईमध्ये क्रेझ आहे़ मध्यंतरी, पोकेमॉन गो, ब्लू व्हेल यासारख्या आॅनलाईन गेमचे मुलांना वेड लागले होते़ आता यामध्ये तब्बल एक जीबीचा असलेला पबजी गेमने भर पाडली आहे़ विविध टास्क, मारधाड अन् आकर्षक व्हिज्युअल्स आणि अॅक्शनमुळे हा गेम तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला आहे. हा गेम ग्रुप-ग्रुपने करून खेळला जात असतो़ यात चॅटींग आणि कॉलींगद्वारे खेळून मुलं गेम खेळण्याचा आनंद घेतात़ विशेष म्हणजे, हा गेम अठरा वर्षांवरील मुलांसाठी आहे़ पण लहान मुलेही मोठ्या प्रमाणात हा गेम खेळत आहेत़ गेमची एवढी क्रेझ वाढली आहे़ रात्री दोन-दोन वाजेपर्यंत तरूण मंडळी ही आपल्या वयक्तीक खोलीत बसून गेम खेळत आहेत़ याचा विपरित परिणाम सध्या गेम खेळणाऱ्या तरूणांवर दिसत आहे़ सध्या परीक्षा सुरू आहे़ पण, अभ्यास न करता रात्री उशिरापर्यंत लहान मुलं सुध्दा एका कोपºयात बसून गेम खेळत असल्यामुळे पालकांना डोके दुखी ठरत आहे़ दरम्यान, या गेममधील विविध खेळामुळे मुलांमध्ये आक्रमक स्वभाव वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. नेहमीच अशी गेम का बनवली जातात ती मुलांच्या मनावर परिणाम करून जातात़ पोकेमॉन तसेच ब्ल्यू व्हेल या गेममुळे अनेक घटना घडल्या आहेत़ मनावर आणि आरोग्यावर प्रभाव करणाºया अशा खेळांपासून पालकांनी मुलांना दुर ठेवणे गरजेचे आहे़ अन्यथा पुढची पिढी ही भावनाहीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ पालकांनी देखील मुलांना विचार करूनच मोबाईल दिला पाहिजे अन् ज्यामुळे आपल्या पाल्याच्या आरोग्यावर परिणाम होईल अशा गेम्सपासून पाल्याला दूर ठेवले पाहिजे़
‘पबजी’ चं लागलयं याड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 11:44 PM