यावेळी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश एफ. के. सिद्दिकी, सहदिवाणी न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे यांनी पंच न्यायाधीश म्हणून तर ॲड. मीना सोनवणे, ॲड. रायसाकडा यांनी पंच सदस्य म्हणू काम पाहिले.
यावेळी पाचोरा न्यायालयात वाद पूर्व १ हजार २८२ प्रकरणे तर न्यायालयातील प्रलंबित ५८ प्रकरणांचा निपटारा करण्यात येऊन एकूण ७६ लाख ७० हजार १७४ रुपयांची वसुली करण्यात आली.
स्पेशल ड्राइव्ह अंतर्गत दि. २२ ते २४ सप्टेंबरपर्यंत कलम २५६ व २५८ मधील एकूण २५ केसेस निकाली काढण्यात आल्या. तसेच दि. २५ रोजी स्पेशल ड्राईव्हमध्ये पेटी केसेसमध्ये ९ केसेस निकाली काढण्यात आले.
लोकन्यायालय यशस्वीतेसाठी वकील संघाचे सदस्य अध्यक्ष ॲड. प्रवीण पाटील, सहायक अधीक्षक जी. आर. पवार, पाचोरा वकील संघाचे ज्येष्ठ व कनिष्ठ सदस्य, ग्रामपंचायत, पंचायत समितीचे विस्तार धिकारी, स्टेट बँकेचे शाखा प्रबंधक, बँक ऑफ महाराष्ट्र, आय. सी. आय. सी. आय. बँक, दूरसंचार कार्यालय, महावितरण कार्यालय, तालुक्यातील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, बँक ऑफ बडोदा, महाराष्ट्र ग्रामीण बँक, पाचोरा पोलीस स्टेशन कर्मचारी, तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ सहायक अमित दायमा, कनिष्ठ सहायक दीपक तायडे आदींनी परिश्रम घेतले.