पाचोरा, जि.जळगाव : पाचोरा वनविभागाचे अधिकारी व कर्मचाºाांनी पाचोरा-भडगाव तालुक्यातील जंगल परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना लॉकडाऊन काळात उपासमारीपासून रोखण्यासाठी २०० कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. कोरोना आजारा संदर्भात वाडा-वस्तीत जाऊन आरोग्य सुरक्षेच्या सूचना व आदेशांचे पालन करण्याचे आवाहन केले.पाचोरा तालुक्यातील कोकडी, लोहारा, म्हासास, पहाण, लाखतांडा, कलमसरा व भडगाव तालुक्यातील नालबंदी, पळासखेडा व धोतरा ही गावे वनक्षेत्राला लागून आहेत. कोरोना आपत्ती काळात जंगलात राहणाº्या प्राणी-पशु-पक्षी यांच्या संरक्षणार्थ तसेच जंगला लगत दुर्गम परिसरात राहणाºया नागरिकांच्या आरोग्य हितासाठी वनअधिकारी ज्ञानेश्वर देसाई व त्यांच्या कार्यालयातील वनरक्षक, वनपाल, डेटा आॅपरेटर या सर्वांनी कोरोनापासून बचाव करण्याचे प्रबोधन केले. लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणाºया गरिबांना कामधंदे व रोजगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ही परिस्थिती पाहता वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच वनात ज्या ठिकाणी वाहने जाऊ शकत नाही अशा भागातील सुमारे २०० बेरोजगार व कोणताही आधार नसलेल्या गरीब कुटुंबातील लोकांना एक किलो तेल, एक किलो साखर, चटणी मसाला, जिरे, चहापत्ती, हळद, साबण, कांदे-बटाटे या जीवनावश्यक किराणा वस्तूची मदत मदत केली. तसेच गावालगत व जंगल परिसरात संचारबंदी काळात लोकांनी विनाकारण वनक्षेत्रात येऊ नये, प्राणी किंवा पशु-पक्ष्यांची शिकार करू नये, अवैध वृक्षतोड करू नये. जंगलात गावठी दारू पाडू नये अशा सूचना स्पिकरवर केल्या. सोबतच नागरिकांनी कोरोना आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सरकारच्या आदेशांचे पालन करावे. अति महत्वाच्या कामांशिवाय घराबाहेर पडू नये, असे प्रबोधन केले.या उपक्रमासाठी वनअधिकारी ज्ञानेश्वर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक जे.व्ही. ठाकरे, सुरेश काळे, बी.सी.पाटील, दिलीप महाजन, राजेंद्र दराडे, आर.सी.पिंजारी, एस.टी.भिलावे, श्रावण पाटील, वाहन चालक सचिन कुमावत, वनपाल सरिता पाटील, वाल्मीक खेडकर, डेटा आॅपरेटर अविनाश भोसले यांनी आर्थिक योगदान व प्रबोधनात्मक सेवेसाठी सहकार्य केले.
पाचोरा वनविभागातर्फे २०० निराधारांना किराणा वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 4:08 PM