पाचोरा : नोंदणीकृत भागीदार संस्था नसताना ती आहे असे भासवून सहयोग क्रियेशन च्या भागीदारांसह जागा मालक व गाळेघेणारे अशा १८ जणांनी पाचोरा पीपल्स बँकेला ८५ लाखाचे कर्ज घेवून फसवणूक केल्याप्रकरणी पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की,पाचोरा येथील नितीन प्रेमचंद संघवी , किशोर पीतांबर पाटील, आण्णा धोंडीराम नागणे, ह्या तिघांनी मिळून भागीदारीत ‘सहयोग क्रियेशन’ नावाची संस्था नोंदणीकृत नसताना ती नोंदणीकृत आहे असे भासवून दि पाचोरा पीपल्स बँकेकडून ८५ लाखांचे कर्ज घेतले मात्र मुदतीत कर्जफेड न करता बँकेची फसवणूक केल्याचा प्रकार लक्षात आहे. त्यातच सहयोग क्रियेशसन च्या भागीदारांनी पाचोरा येथील छत्रपती संभाजी चौकाजवळील पुजारी यांचा प्लॉट न ५,६,११,१२ ही जागा करारनामा लिहून बँकेला गहाण लिहून दिली मात्र बोजा बसवून उतारा संबंधितांनी न देता बँकेकडून कर्ज घेऊन ‘महावीर हाईट्स’ नावाची शॉपिंग सेंटर गाळे बांधून १४ जणांना विक्री केले मात्र मुदतीत कर्जफेड न करता गाळे परस्पर विक्री केले व बँकेची ८५ लाखात फसवणूक केली.यांच्याविरूद्ध गुन्हा दाखलयाप्रकरणी बँकेतर्फे राजेंद्र सीताराम पाटील यांचे फियार्दीवरून नितीन प्रेमचंद संघवी, किशोर पीतांबर पाटील, आण्णा धोंडीराम नागणे, प्रशांत बाळकृष्ण पुजारी, हर्षल पाटील, भाऊसाहेब पाटील, स्वप्नील सपकाळे, साहेबराव एकनाथ पाटील,गंगाधर पाटील, ज्योती पुजारी, रत्नमाला वले, साहेबराव थोरात, वैशाली भदाणे, तुषार पाटील,राकेश देवरे, सिंधुबाई सोनवणे, ज्ञानेश्वर न्हावी, जितेंद्र छाजेड, ह्या १८ जणांविरुद्ध भादवी ४०६,४०८,४०९ ,४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून तपास पीएसआय गणेश चोभे करीत आहेत. ह्या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पाचोरा पीपल्स बँकेची ८५ लाखात फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 8:17 PM