शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

पाचोरा तालुक्याला पावसाने झोडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 8:24 PM

पिकांचे नुकसान : हिवरा नदीला महापूर, जनजीवन झाले विस्कळीत

पाचोरा : शहरासह तालुक्यातील बहुतांश भागात १२ रोजी मध्यरात्रीनंतर मुसळधार पाऊस झाला. गाळण भागात अतिवृष्टी होऊन १२६ मिमी पावसाची नोंद झाली. नांद्रा व कुºहाड भागात मात्र पाऊस पडला नाही. तर अनेक भागात पावसाने पिकांचे नुकसान केले आहे.शहरात मुसळधार पाऊस पडूनही २२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली ती शंकास्पद असल्याची भावना शहरातील सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली.नगरदेवळा भागात ८० मिमि पिंपळगाव हरे ४२ मिमी, वरखेडी ५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. पाचोरा तालुक्यात आजपर्यंत ६२०.९९ मिमी सारसरीपावसाच नोंद झाली आहे.काही शेतांमध्ये साचले पाणीशिंदाड भागात रत्नाबाई संजय पाटील या महिलेच्या शेतात नाल्याचे पाणी घुसून कपाशीचे शेत वाहून नुकसान झाले. शिवारात बऱ्याच ठिकाणी मक्का , ज्वारी , बाजरी ही पिके आडवे पडली. तर काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने पिके सडण्याची भीती शेतकरी वर्गात व्यक्त होत आहे.शेतीचे नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.आॅक्सिजन सिलिंडर पाण्यातून नेताना कसरतअत्यावश्यक सेवेसाठी असलेले व दवाखान्यात लागणारे आॅक्सिजन सिलेंडर घेऊन जाताना मोटरसायकल पाण्यातून नेताना बंद पडली. रुग्णाच्या नातेवाईकांना मोठी कसरत करत हे सिलिंडर पाणी साचलेल्या भुयारी मागार्तूनच घेऊन जावे लागेले. शहराच्या या भयानक परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये नगरपालिका प्रशासनाचे विरुद्ध संतापाची लाट उसळली. दरवेळी पाऊस पडला की, येथे पाणी साचते.जलाशये झाले ओव्हरफ्लोतालुक्यातील बहुळा, हिवरा, अग्नावती हे तीनही मध्यम प्रकल्प पूर्ण भरले आहेत. २२ लघु प्रकल्पात सार्वे पिंपरी, राजुरी, अटलगव्हाण, कोल्हे, डांभुर्णी, पिंपरी, पिंपळगाव, घोडसगाव, गाळण १ व गाळण २, खाजोळे, सारवे, दिघी१ व दिघी२, सातगाव, गहुले, म्हसळा, वाकडी, लोहारा, बांंबरुड, गारखेडा, मोहाडी आदी प्रकल्पात १०० टक्के जलसाठा झाला असून पाझर तलाव देखील ओव्हरफ्लो झाले आहेत.दोन भागांचा संपर्क तुटलामुसळधार पावसाने सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले असून सर्वच नद्यांना पूर आलेला आहे. पाचोरा शहरात रात्री ११ ते २ च्या सुमारास मुसळधार पासावने रेल्वे भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शहराचा पश्चिम भागाशी संपर्क तुटला. शहरातून जाणाºया हिवरा नदी वरील पुलावरून पुराचे मोठे प्रमाणात पाणी वाहत असून कृष्णापुरी भागाचाही पाचोरा शहराशी संपर्क तुटला. परिणामी या लोकांना खूप फेºयाने ये- जा करावी लागली. त्यातच शहरात प्रवेश करणारा एकमेव जळगाव चौफूली बस स्टँडरोड असल्याने या मार्गावर काँक्रिटीकरण कामामळे प्रचंड ट्रॅफिक जाम झाली. सुमारे दोन दोन तास नागरिकांना ताटकळावे लागले.