शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
3
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
8
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
9
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
10
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
11
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
12
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
13
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
14
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
15
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
16
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
17
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
18
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
19
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

पाचोऱ्याला बालाजी रथपूजन जल्लोषात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 1:51 PM

मंत्रघोषाच्या गजरात आणि श्री बालाजी महाराजांचा जयघोषात येथील पारंपरिक रथाचे रविवारी सकाळी पूजन उत्साहात करण्यात आले

ठळक मुद्देपाच पावले सरकला रथरथयात्रा झाली रद्द
पाचोरा : मंत्रघोषाच्या गजरात आणि श्री बालाजी महाराजांचा जयघोषात येथील पारंपरिक रथाचे रविवारी सकाळी पूजन उत्साहात करण्यात आले, तर यापूर्वीच रथयात्रा रद्द केल्याचे आयोजकांनी जाहीर केले होते.बालाजी महाराजांच्या रथाचे पूजन सकाळी साडेअकराला करण्यात आले. यावर्षी रथाच्या पूजेचा मान भालचंद्र पाटील आणि संगीता पाटील या दांपत्याला मिळाला. बालाजी महाराजांच्या रथाला दोर बांधून लोक समूहाद्वारे केवळ पाच पावले रथ ओढण्यात आला. यावेळी रथासमोर सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. लहानमोठी दुकाने सजल्याचे दिसून आले.बालाजी रथाची आख्यायिकापाचोरा येथील अर्जुन पाटील यांचे वंशज रामा पाटील यांचे भाऊ श्यामा पाटील हे दरवर्षी दिंडीसोबत श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारी करायचे. एकदा ते पंढरपूरला वारीसाठी गेलेले असताना चंद्रभागेच्या तीरावर पाणी पिण्यासाठी नदीच्या प्रवाहात हात घातलेला असताना त्यांना श्री बालाजी महाराजांची दगडी मूर्ती त्यांना गवसली. परमेश्वर प्रसन्न झाला. या भावनेने त्यांनी ती मूर्ती दिंडीसोबत पाचोर्‍याला आणले आणि हा वृत्तांत आपल्या भावांना सांगितला. श्यामा पाटील यांना गृलबाळ नसल्याने त्यांच्या वाट्याला जी संपत्ती आली तिचा विनियोग सर्व भावांनी पाचोरा येथे श्री बालाजी मंदिर तयार करण्यासाठी केला. काशी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, देऊळगाव राजा येथील पंडित व महंत यांच्या हस्ते या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि तेव्हापासून रथाची मिरवणूक उत्सव सुरू झाला.रथ थांबवणे,वळवणे यासाठी लाकडी मोगरीचा उपयोग केला जातो. मोगरी लावण्याचे काम अशोक वाडेकर व सुभाष सोनवणे व संपूर्ण परिवाराने पार पडले. परशुराम अहिरे आणि त्यांचे सहकारी नितीन शिरसाठ यांनी पारंपरिक पद्धतीने रथासमोर मशाल लावण्याचे काम पहिले. सयाजी पाटील परिवार आणि भक्त यांच्या अथक परिश्रमातून दरवर्षी निघणारी ही मिरवणूक लक्षवेधी ठरते.बालाजी महाराजांच्या रथाची परंपराबालाजी महाराजांचा रथ हा पाचोरा नगरदेवळा येथील कुशल कारागिरांनी सागवानी लाकडापासून तयार केला आहे. रथाची उंची ३० फूट इतकी आहे. रथावर सुंदर कोरीव नक्षीकाम करण्यात आलेले असून त्यावर कळस ठेवला जातो. अग्रभागी लाकडी घोडे आणि सारथी म्हणून अर्जुनाची मूर्ती बसवलेली असते. त्यांच्या दोन्ही बाजूस चोपदार यांच्या मूर्ती उभ्या केलेल्या असतात तर मागील बाजूस राक्षसाच्या मूर्ती उभ्या केलेल्या असतात. पुढील भागाच्या कळसाचे खाली परी आणि हनुमान यांच्या मूर्ती बसवल्या होत्या. रथाचे चारही बाजूस भगवे निशाण, ध्वज, केळीचे खांब, ऊस, झेंडूच्या फुलांच्या माळा लावून सुशोभित केला जातो. तसेच रथावर विजेची रोषणाई केली जात असल्यामुळे रथ खूपच विलोभनीय भासतो.उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किसनराव पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, पीएसआय गणेश चोबे, एपीआय राहुल मोरे, पी एस आय विकास पाटील यांचेसह सर्व पोलीस प्रशासनाने चोख प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला.
टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमPachoraपाचोरा