भुुसावळ, जि.जळगाव : येथील जय मातृभूमी मंडळ आयोजित नरक चतरुदर्शी अभंग्य स्नानाच्या मुहूर्तावर मंगळवारी पहाटे भक्तीसंगीताचा ‘पाडवा पहाट’ कार्यक्रम रंगला.गायक भगवान बाभूळकर, लीलाधर पटोले, गायिका वाचस्वती चंदेल, मनीषा पटोले यांच्या संगीत सुरांनी रसिक भावूक झाले होते.अभंग, भजन, भूपाळी व भावगीतांचा श्रोत्यांनी आनंद घेतला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक मनोज बियाणी, पिंटू ठाकूर, दीपक धांडे, ज्येष्ठ नागरिक अरुण मांडलकर, रघुनाथ सोनावणे, रजनी सावकारे, भारती भोळे, संगीता बियाणी, नगरसेविका सुषमा पाटील व माजी नगरसेविका शालिनी कोलते, संस्थापक अध्यक्ष किरण कोलते, अध्यक्ष किशोर पाटील, उपाध्यक्ष पिंटू बºहाटे आदी उपस्थित होते.एक सूर निरागस हो गणपती, आली माझ्या घरी ही दिवाळी, रुक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे व शेवटी भैरवी सादर सादर करण्यात आली. आभार प्रदर्शन किरण कोलते यांनी केले.
भुसावळ येथे ‘पहाट पाडवा’ कार्यक्रम रंगला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 9:06 PM
भुुसावळ येथील जय मातृभूमी मंडळ आयोजित नरक चतरुदर्शी अभंग्य स्नानाच्या मुहूर्तावर मंगळवारी पहाटे भक्तीसंगीताचा ‘पाडवा पहाट’ कार्यक्रम रंगला.
ठळक मुद्देसंगीत सुरांनी रसिक भावूकएक सूर निरागस हो गणपती, आली माझ्या घरी ही दिवाळी ठरले लक्षवेधी