पहूर ता जामनेर:- पहूर येथील एक व्यक्ती बाधीत असल्याचा पाँझिटीव्ह अहवालाने रविवारी सकाळी तालुका प्रशासन व आरोग्य विभाग हादरला. बाधित रुग्णाची ओळख पटण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाकडून माहिती स्पष्टपणे समोर न आल्याने संभ्रम वाढला.अखेर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहिती वरून पाळधी ता. जामनेर येथील व्यक्ती बाधित असल्याचे स्पष्ट झाले.पाळधी येथील संबंधित बाधित व्यक्तीची मागील आठवड्यात पहूर ग्रामीण रुग्णालयात तपासणी केली. यादरम्यान यारुग्णाला कोरोणा सदृष्य लक्षणे आढळल्याने वैद्यकीय अधिक्षक डॉ. चांदा यांनी जळगाव कोवीड रुग्णालयात १९ रोजी मंगळवारी रवाना केले होते. याठिकाणी त्याचे स्वॅब घेण्यात आले. अहवाल प्रतिक्षेत होता. शनिवारी रात्री उशिरापर्यंत अहवाल पहूर नावाने पाँझिटीव्ह आला. मात्र यात रुग्णाची माहिती पूर्ण नव्हती. त्यामुळे संदिग्धता निर्माण झाली व जिल्हा रूग्णालयाकडून तालुका प्रशासन व आरोग्य विभागाला स्पष्ट माहिती देण्यात आली नाही. अखेर रविवारी साडे दहाच्या सुमारास जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांना बाधित रुग्ण पाळधी, ता जामनेर येथील असल्याची खात्री झाली. त्यानुसार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे व वाकोद प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाटील यांनी पाळधी गाठले.त्यानंतर पहूर येथील नागरिक व संबंधिताचे नातेवाईक यांच्या चचेर्ला पूर्णविराम मिळाला.
पहूरचा पॉझिटीव्ह अहवाल पाळधी येथील व्यक्तीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 4:41 PM