शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

लोनची रिकव्हरीसाठी धमक्या देतात पगारी गुंड, बंगळुरुच्या कंपनीचं चीन कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 7:42 AM

कंपन्यांकडून डेटाही होतोय चोरी; सायबर गुन्हेगारीचे कनेक्शन चीनपर्यंत

सागर दुबे  जळगाव : लोन ॲपच्या माध्यमातून अनेकांना लुबाडणाऱ्या बंगळुरू येथील टोळीला जळगाव सायबर पोलिसांनी बेड्या ठोकताच या टोळीचे कनेक्शन चीनपर्यंत असल्याचे समोर आले आहे. लोन ॲपच्या माध्यमातून भारतातून गोळा झालेला पैसा चीनमध्ये ऑनलाइन व्यवहाराद्वारे पोहोचविला जात असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. 

जुलै महिन्यात पहुर येथील एका व्यक्तीला विविध लोन ॲप डाउनलोड करायला सांगून पैशांची मागणी केलेली नसतानासुद्धा ६ लाखांची रक्कम खात्यावर पाठविली होती. त्यानंतर ती रक्कम व्याजासह परत करावी म्हणून त्या व्यक्तीला सायबर चोरट्यांनी जिवे मारण्याची धमकी देऊन ४ लाखांची खंडणी उकळली होती. याबाबत सायबर पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली होती. गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिस सायबर चोरट्यांच्या शोधार्थ होते. अखेर २६ नोव्हेंबरला बंगळुरू येथे पोलिसांना प्रवीण गोविंदराज (२८) व सतीश पेन चल्लेया (२१) हे दोन सायबर भामटे हाती लागले. अन् दोघांची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर धक्कादायक खुलासे समोर आले. या फसवणूक प्रकरणाचे चीन कनेक्शन असल्याचे समोर आले.

पगारी म्होरके नेमले...चीन येथील व्यक्तीकडून बंगळुरूच्या टोळीकडे कॉल सेंटर चालवण्याचे काम देण्यात आले होते. या टोळीतील सदस्य बंगळुरूच्या कॉल सेंटरमध्ये बसून व्हॉट्सॲप कॉल व मेसेज करून कर्जदारांना धमकावत होते. विशेषत: कर्जदारांना धमकावून त्यांच्याकडून विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरून घेतले जात होते. जर कर्जदारांनी पैसे नाही भरले तर त्यांच्या फोटोंचे मॉर्फिंग करून अश्लील चित्रफीत आणि मजकूर बनवून तो कर्जदारांच्या मोबाइलमधील काँटॅक्ट लिस्टमधील नंबरवर व्हायरल करण्याचे काम या टोळीकडे सोपवण्यात आले होते. टोळीतील दोघांची पगारावर नेमणूक करण्यात आली होती. 

संपूर्ण व्यवहार ऑनलाइन...पोलिसांना चकविण्यासाठी खंडणीची रक्कम एका लिंकद्वारे मागवून ती विविध बँक खात्यांद्वारे पाठविली जाते. ही रक्कम देशातून चीनमधील व्यक्तीला ट्रान्स्फर झाल्यावर त्यानंतर विविध बँक खात्यांच्या माध्यमातून खंडणी मागणाऱ्या व धमकविणाऱ्याच्या खात्यावर पगाराची रक्कम जमा व्हायची. संपूर्ण ऑनलाइन व्यवहारासाठी सायबर चोरटे काही व्यक्तींचे भाड्यानेसुद्धा बँक खाते घेत होते. मात्र, कोटी रुपयांचे ट्रॅन्झॅक्शन झाल्यानंतर ७ दिवसांत हे बँक अकाउंट बंद किंवा ब्लॉक व्हायचे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमJalgaonजळगाव