भारताचे विदेशमंत्री एस. जयशंकर हे ऑस्ट्रिया दौऱ्यावर आहेत. येथे त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. मात्र, दहशतवाद ही जगातील सर्वात मोठी समस्या असल्याचं ते म्हणाले. युरोपातील नेत्यांशी संवाद साधतानाही त्यांनी शांती आणि स्थिरता यासाठी दहशतवाद मिटवणे गरजेचं असल्याचं म्हटलं. त्यासोबतच, जगभरातील दहशतवादाचा केंद्रबिंदू हा आमच्या देशाजवळ असल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं. एस. जयशंकर यांच्या या विधानावरुन मुलाखतीदरम्यान न्यूज अँकरने त्यांना उलटप्रश्न केला. त्यावरही त्यांनी रोखठोक आपली भूमिका मांडली. त्यामुळे, जयशंकर यांचा मुलाखतीमधील हा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे.
मुलाखतीदरम्यान न्यूज अँकरने थेट पाकिस्तानचा उल्लेख करत आपण यापूर्वीही पाकिस्तान हा दहशतवादाचा केंद्रबिंदू आहे असं म्हटलं, केंद्रबिंदू हा शब्दप्रयोग योग्य ठरेल का? असा प्रतिप्रश्न एस जयशंकर यांनी केला होता. त्यावर, जयशंकर यांनी रोखठोक उत्तर दिलं. आजही मी तेच साांगतोय आणि पाकिस्तानचा उल्लेख मी केलेला नाही. आपण एक राजकीय व्यक्ती आहात, याचा अर्थ असा नाही की खरं बोलायला नाही पाहिजे. मी आणखी एखादा अवघड शब्दप्रयोग करू शकलो असतो, पण विश्वास ठेवा, सध्या भारतासोबत जे काही होतंय. त्यासाठी केंद्रबिंदू हा शब्दप्रयोगही लहान आहे, अशा शब्दात पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर दिलं.
पाकिस्तान हाच तो देश आहे, ज्याने आमच्या देशातील संसदेवर हल्लाबोल केला. हा तोच देश आहे, ज्याने आमच्या मुंबईवर दहशतवादी हल्ला केला. हा तोच देश आहे, जो आमच्या देशातील हॉटेल्स आणि पर्यटनस्थळाला लक्ष्य करतो. जो दररोज घुसखोरांना दहशतवादासाठी भारतात पाठवतो. तुमच्या सीमाभागात मुक्तपणे दहशतवादी फिरत असतात, तुमच्या सीमारेषेवर त्यांचं नियंत्रण असतं. म्हणजे पाकिस्तानाला हे काहीच माहिती नाही का? अशा शब्दात जयशंकर यांनी विस्तृतपणे उत्तर दिले. जेव्हा दहशतवादी हे सैन्याच्या रणनितीचा वापर दहशतवादी ट्रेनिंगच्या कारवायांसाठी करतात, असेही जयशंकर यांनी म्हटले.
दरम्यान, जगभरातील देशांनी दहशवादावर चिंता केली पाहिजे, केवळ दुसऱ्या देशाचा व्यक्तिगत मुद्दा आहे, असे समजून दुर्लक्ष करता कामा नये, असेही त्यांनी युरोपीय देशांबाबतीत म्हटले