जळगाव : सिंधी कॉलनीतील पूज्य सेवा मंडलात वर्सी महोत्सवाचा मोठ्या थाटात समारोप झाला. अखेरच्या दिवशी सिंधी समाज बांधवांनी संत बाबा हरदासराम व संत बाबा गेलाराम महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच लांबच लांब रांगा लावल्या होत्या. याप्रसंगी भाविकांनी ‘पल्लव साहेब’ या कार्यक्रमाला उपस्थिती देत संताचे कृपाआशीर्वाद घेतले.सालाबादप्रमाणे पूज्य सेवा मंडलातर्फे वर्सी महोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. वर्सी महोत्सवाच्या सांगता दिनी मंगळवारी पहाटे पासून भाविकांची पूज्य सेवा मंडलात दर्शनासाठी गर्दी झाली होती.दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांगावर्सी महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा पल्लव साहेब या कार्यक्रमाला सकाळी सुरुवात झाली. सकाळी ११ वाजता संत राजेशलाल, देवीदासभाई, साई बलराम अशोक शर्मा महाराज, विशनीबाई, बीएचआर महिला मंडलच्यावतीने माया तलरेजा यांच्या उपस्थितीत पल्लव साहेबचा कार्यक्रम झाला.सुख, शांती व समृद्धीसाठी प्रार्थनाभाविकांनी पूज्य सेवा मंडलात सुख, शांती व समृद्धी, व्यवसायात बरकत येवो, चांगले आरोग्य लाभो अशा प्रार्थना करण्यात आल्या.सोमवारी रात्री सामाजिक व न्याय विभागाचे मंत्री दिलीप कांबळे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे, माजी आमदार गुरुमुख जगवानी, माजी महापौर ललित कोल्हे, अशोक लाडवंजारी आदींनी भेट देऊन बाबांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर रात्री भजन, गीतांचा कार्यक्रम झाला. रात्री उशिरा पाकिस्तानचे संत साई साधराम साहेब यांचे आगमन झाले. त्यांचेही प्रवचन झाले.महोत्सवादरम्यान झालेल्या रक्तदान शिबिरात ५०० जणांनी रक्तदान केले. डॉ. समीक्षा तलरेजा, डॉ. संदीप गांगुर्डे यांनी फिजिओथेरपी शिबिर घेत तपासणी केली.ट्रस्टच्यावतीने रमेश मतानी, विजय दारा, अशोक मंधान, भगत बालानी, राजू अडवाणी, सतीश पंजाबी, राम कटारिया, विशनदास मतानी, हेमू भावनानी, कन्हैयालाल कुकरेजा, नंदलाल कुकरेजा, जगदीश कुकरेजा, शंकर मेहता, शंकरलाल लखवाणी यांच्यासह पदाधिकारी, सदस्य, सेवेकरी, समाजबांधव आदींनी सहभागी होत सेवा केली.महोत्सवादरम्यान विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी भेट देत बाबांचे आशीर्वाद घेतले. या महोत्सवासाठी पोलीस प्रशासन, मनपा यांचे सहकार्य लाभल्याची माहिती ट्रस्टच्यावतीने अशोक मंधान यांनी दिली.
पल्लव साहेबने वर्सी महोत्सवाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:31 PM
दर्शनासाठी रांगा
ठळक मुद्देदेशभरातील हजारो भाविक परतले माघारीसुख, शांती व समृद्धीसाठी प्रार्थना