जळगाव : अवकाळी पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मात्र सलग लागून आलेल्या दिवाळीच्या सुट्टीमुळे जिल्ह्यात अद्याप पंचनाम्यांना सुरुवीतदेखील झालेली नाही. त्यामुळे बळीराजा अधिकारी, कर्मचाºयांची शेताच्या बांधावर प्रतीक्षा करीत आहे.यंदा पावसाळा संपला तरी अवकाळी पाऊस सुरुच असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. उभ्या पिकांवर बुरशी लागण्यासह कोंबही फुटले आहेत. त्यामुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून बळीराजा हवालदिल झाला आहे.जिल्ह्यातील या नुकसानीविषयी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकाºयांना पत्र देऊन झालेल्या नुकसानीचे विहीत प्रपत्रातील प्राथमिक अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. २७ आॅक्टोबर रोजी या विषयी पत्र काढले असले तरी दिवाळीच्या सुट्ट्या सुरू असल्याने कोठेही पंचनामे सुरू झालेले नाही. त्यामुळे पंचनामे कधी होतील व त्याचा मोबदला कधी मिळेल, याच चिंतेत बळीराजा आहे.दरम्यान, ज्या शेतकºयांनी पीकविमा काढलेला आहे, त्यांनी केवळ आॅनलाईन अर्ज दाखल करायचा असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली. यासाठी सातबारा व इतर कागदपत्रे द्यावे, लागतील, अशी अफवा पसरलविली जात असून त्यावर विश्वास ठेवू नये, अशीही माहिती मिळाली. यासाठी आॅनलाईन अर्ज भरावा, असे आवाहन ठाकूर यांनी केले.
दिवाळीच्या सुट्टीत अडकले पिकांच्या नुकसानीचे पंचनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 12:23 PM