शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

पंढरीचे वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 9:25 PM

मुक्तकैवल्य तेजोनिधी संतसम्राट ज्ञानोबाराय यांच्या पालखीचे नुकतेच प्रस्थान झालेले आहे. आजमितीला सर्वजण महासंकटाला सामोरे जात आहेत. संकटे ही प्रत्येकाच्या ...

मुक्तकैवल्य तेजोनिधी संतसम्राट ज्ञानोबाराय यांच्या पालखीचे नुकतेच प्रस्थान झालेले आहे. आजमितीला सर्वजण महासंकटाला सामोरे जात आहेत. संकटे ही प्रत्येकाच्या जीवनात पदोपदी येत असतात आणि या संकटांना तोंड देण्याची शक्ती पांडुरंग परमात्मा आपल्याला क्षणाक्षणाला प्रदान करत असतात. संसाररूपी प्रपंच चालवत असताना पांडुरंगाच्या भक्तीत जीवन घालवत असताना वारकऱ्यांच्या जीवनातील सुवर्णकाळ म्हणून पंढरीच्या वारीला ओळखले जाते.वर्षभर काबाडकष्ट करणाºया माझा शेतकरीराजा व वारकऱ्यांसाठी हा सोहळा स्वर्गसुखाच्या अनुभूतीच्या कितीतरी पटीने मोठा असतो. कारण याच वारीत आम्हाला विठूरायांच्या भेटीच्या आसेबरोबर जीवनात यशस्वी वाटचाल कशी करायची याची प्रत्यक्ष अनुभूती मिळते. वारीत सहभागी होणारे प्रत्येकजण आपली संपत्ती, पद, पैसा या सर्व क्षणिक सुख देणाºया गोष्टी विसरून सहभागी झालेले असतात. वारीत प्रत्येकजण फक्त पंढरीचा वारकरी म्हणूनच सहभागी झालेला असतो. जीवनातील सर्वोच्च आनंदाची अनुभूती जर प्राप्त करायची असेल तर जीवनात एकदा तरी पंढरीची वारी करायला हवी. कारण आपण विश्वातील सर्व तीर्थ करून बसलो तरी जो आनंद पंढरीच्या वारीत प्राप्त होत तो अन्य ठिकाणी आपल्याला मिळू शकत नाही. तुकोबाराय वर्णन करतात,तीर्थे केली कोटीवरी ।नाहीदेखील पंढरी ।।आपण कोटीने तीर्थे केली असतील पण जर आपण पंढरीच्या पांडुरंगाला जर वारीतून भेटायला गेला नसाल तर तुमच्या अनेकविध केलेल्या तीर्थांना काहीही फायदा नाही त्यामुळे जीवनात आल्यानंतर प्रत्येकाने एकदातरी वारी करायला पाहिजे. वारी या शब्दातच ‘वार’ हा शब्द येतो आणि निश्चितच पंढरीच्या वारीमुळे पांडुरंग परमात्मा आपल्याला आपल्या अंगी असणाºया षड्विकारांवर वार करण्याची सद्बुद्धी देतात, सर्वजणांनी वारीचे अनन्यसाधारण असे महत्व जाणून वारी करून जीवन सार्थकी लावायला पाहिजे.तुकोबाराय म्हणतात जर जीवनात दु:खाची विरक्ती व सुखाची प्राप्ती करून घ्यायची असेल म्हणजेच मोक्षप्राप्ती करून घ्यायची असेल तर पंढरीच्या वारीत सहभागी होऊन सुवणर् पर्वकाळाचे साक्षीदार व्हायला पाहिजे, पण यावर्षी अपवादात्मक परिस्थितीमुळे कोणतेही वारकरी वारीत सहभागी होऊ शकत नाही. अशा वेळेसयावर्षी घरीच करूया वारी। तेव्हाच पळून जाईल कोरोना महामारी।।आपणा सर्वांना यावर्षी आपापल्या घरीच राहून विठूरायाला प्रार्थना करायची आहे की, आम्हाला या संकटातून मुक्त करा! निश्चितच विठूराय आपल्या सर्वांच्या हाकेला साद घालून या संकटातून आपल्याला तारेल व आपण पुढच्या वर्षीच्या पंढरीच्या वारीत सहभागी होऊन नक्कीच आनंद घेऊ...!- गजानन महाराज वरसाडेकर, पिंप्राळा.

टॅग्स :Jalgaonजळगाव