शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

पपईचे भाव गडगडले, किलोला फक्त तीन रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 1:51 AM

केळी आणि कापसानंतर ज्या हुकमी पिकाकडे बघितले जाते त्या पपईचे भाव गडगडल्यामुळे उत्पादक शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.

ठळक मुद्दे कजगाव परिसरात दुष्काळात तेरावा महिन्याची उत्पादकांना अनुभूतीपपई खरेदीदार व्यापाºयांनी भाव पाडल्याची चर्चा

कजगाव ता.भडगाव : केळी आणि कापसानंतर ज्या हुकमी पिकाकडे बघितले जाते त्या पपईचे भाव गडगडल्यामुळे उत्पादक शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे.सुरुवातीला १४ ते १६ रुपये किलो असलेले पपईचे भाव चक्क ३ रुपयांवर येऊन ठेपल्याने यात शेतकऱ्यांचा झालेला खर्चही निघत नसल्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशीच काहीशी स्थिती झाली आहे. काही वर्षांपूर्वी कजगावसह परिसरात केळी व कापसाची दरवर्षी मोठ्या प्रमाणात लागवड केली जात होती. मात्र गेल्या तीन चार वर्षांपासून दिवसेंदिवस कमी होत असलेल्या पावसामुळे शेतकºयांनी इतर पिकाकडे आपला मोर्चा वळविला आहे. यात प्रामुख्याने भाजीपाला तसेच पपई व इतर फळपिकांंच्या लागवडीकडे त्यांचा मोठा कल दिसून आला आहे. तथापि महागडे बी- बियाणे टाकून पिकवलेल्या शेती मालाचे भाव नेहमीच गडगडलेले रहात असल्याने शेतकरी पार मेटाकुटीस आला आहे. या वर्षी संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ आहे. त्यामुळे पपईसारख्या जेमतेम पाण्यावर वाचविलेले फळपीक देखील मातीमोल किमतीत विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. यात झालेल्या खर्चापेक्षा भाव कमी मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सुरुवातीला १४ ते १६ रुपये किलो विकली जाणारी पपई गेल्या आठवड्यापासून चक्क ३ रुपये किलो अशा पडेल भावात व्यापारी मागत आहेत. ते देखील आठ ते दहा दिवस उधार या पध्दतीने व्यवहार होत असून पपई उत्पादकांची पंचाईत झाली आहे.दुष्काळात तेरावा महिनाशासनाने संपूर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर केला असला तरी शेतकºयांच्या नशिबी आलेले असाह्यपण कायम आहे. कजगाव भागातील नदी पूर्ण पावसाळ्यात कोरडीच होती. शेत शिवार ओस पडले होते. बागायतदार शेतकºयांच्या विहिरींनीही तळ गाठला होता. अशात जेमतेम पाण्यावर रात्रंदिवस एक करीत काहींच्या हातात पीक पडले, मात्र सारेच भाव गडगडल्याने शेतकºयांचे आर्थिक गणित देखील कोलमडले आहे. निसर्गाच्या मारानंतर शेती मालाचे भाव कोसळल्याने दुष्काळात तेरावा महिना अशीच स्थिती शेतकºयांची झाली आहे एकीकडे पाण्याअभावी पिके उपटून फेकली जात आहेत तर दुसरीकडे भाव नसल्याने शेतकºयांना मनस्ताप होत आहे. सुरुवातीला सहा हजार रुपये क्विंटलप्रमाणे कापूस विकला गेला मात्र या नंतर भाव सारखे गडगडत राहिले. ते आता पाच हजार चारशे ते पाच हजार सहाशे पर्यंत आहेत. भाव वाढीची वाट पाहणाºया शेतकºयांच्या पदरी निराशा पडत आहे. 

टॅग्स :fruitsफळे