जळगाव : समांतर रस्त्यांचा ‘डीपीआर’ तयार करून हे रस्ते तयार करण्याची जबाबदारी राष्टÑीय रस्ते विकास प्राधिकरणाने दाखविल्याने रस्त्यांची जागा त्यांच्याकडे हस्तांतरीत करण्यासंदर्भात महापालिका निर्णय घेणार आहे. यासाठी मनपाची येत्या २८ रोजी महासभा होणार आहे. महापालिकेची महासभा येत्या २८ रोजी सकाळी ११ वाजता महापौर नितीन लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली होणारआहे. गेल्या महिन्यात विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाची आचारसंहिता असल्यामुळे महासभा होऊ शकली नव्हती. ही आचारसंहिता संपल्याने ही सभा होत आहे. १३ विषयांवर होणार चर्चाविषय पत्रिकेवरील १३ विषयांवर या बैठकीत चर्चा होऊन ठराव होतील. यात प्रामुख्याने नरेंद्र गोपाळ काळे व इतर १९ अस्थायी वाहन चालक यांनी औरंगाबाद खंडीपाठात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे या कर्मचाºयांना नियुक्तीपत्र तसेच अस्थापना खर्चाची ३५ टक्के मर्यादेची अट शिथील करण्याबाबत बैठकीत निर्णय होईल. एमआयडीसी क्षेत्रास वाघूरचे पाणी देण्याबाबत प्रशासनाकडून प्रस्ताव आहे. एमआयडीसीच्या साकेगाव पाणी पुरवठा योजनेच्या नव्या पाईप लाईनचे काम सुरू आहे. त्यामुळे काही वेळेस एमआयडीसीच्या पाणी पुरवठ्यात व्यत्यय येणार असल्याने उद्योजकांची गैरसोय होऊ नये म्हणून एमआयडीसीकडून मनपास प्रस्ताव प्राप्त झाला आहे. समांतर रस्त्याबाबत निर्णयशहरातून जाणाºया महामार्गाचे विस्तारीकरण, समांतर रस्ते, त्यात येणारे पुल व अन्य कामे करण्याची तयारी राष्टÑीय रस्ते विकास प्राधिकरणाने दाखविली असून त्यासाठी ४५० कोटींचा डीपीआर तयार केला आहे. ही बाब लक्षात घेऊन मनपा समांतर रस्त्यांची जागा या विभाागकडे हस्तांतरीत करणार आहे.
समांतर रस्ते हस्तांतरीत होणार
By admin | Published: February 22, 2017 12:36 AM