शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

पालकांनो वेळीच लक्ष द्या; आपला मुलगा सतत एकटा राहतो, भाषा विकासाला विलंब होतो का?

By विजय.सैतवाल | Published: April 01, 2023 4:17 PM

२ एप्रिल हा जागतिक ऑटिझम जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. या अवस्थेविषयी जनजागृती केली जाते, यासोबत पालकांनीही सजग होणे आवश्यक असल्याचा सल्ला दिला जात आहे.

जळगाव : शिकलेले शब्द, बडबडीचे आवाज किंवा सामाजिक कौशल्ये विसरणे, नजर देणे टाळणे,  सतत एकटे रहाणे इतर लोकांच्या भावना समजून घेण्यात अडचण येणे,  भाषाविकासाला विलंब लागणे, अशी लक्षणे आपल्या मुलांमध्ये आढळून आल्यास वेळीच लक्ष द्या. कारण ही लक्षणे ‘ऑटिझम’ (स्वमग्नता) या मेंदूच्या वेगळ्या अवस्थेची आहे. त्यांचे जलद निदान व उपचार झाल्यास आपली मुले त्यातून बाहेर पडू शकतात. 

२ एप्रिल हा जागतिक ऑटिझम जनजागृती दिवस म्हणून साजरा केला जातो. या अवस्थेविषयी जनजागृती केली जाते, यासोबत पालकांनीही सजग होणे आवश्यक असल्याचा सल्ला दिला जात आहे. ऑटिझम हा आजार नसून ती मेंदूची अशी अवस्था आहे, ज्यामध्ये व्यक्तीचे बोलणे संवाद साधणे, वागणे आणि काही वर्तने समाजात सामान्य मानल्या जाणाऱ्या वर्तनांपेक्षा वेगळे असू शकतात. ऑटिझम ही एक ‘न्यूरो डाएव्हर्जन्स’ (मानसिक विभिन्नता) म्हणजेच मेंदूची काम करण्याची वेगळी पध्दती, असे म्हटले जाते. 

मेंदूच्या पेशींची जोडणी वेगळ्या प्रकारचीऑटिझम हा न्युरो डेव्हलेपमेंटल डिसऑर्डर आहे. त्याची निश्चित कारण अजूनतरी समजू शकलेली नाही. गर्भावस्थेपासून या मुलांच्या मेंदूच्या पेशींची जोडणी वेगळ्या प्रकारची असल्याने मेंदूची वेगळी कार्यप्रणाली दिसून येते.  सर्वसाधारण मुलं जेव्हा इतर लोक जे बोलतात, वागतात त्याला समजून घेऊन त्याला प्रतिसादात्मक कृती करतात त्यासाठी आवाज, शब्द आणि हालचालीचा वापर करतात. पण ऑटीझम झालेल्या मुलांमध्ये या जाणिवा तितक्याशा विकसित झालेल्या नसतात म्हणूनच त्यांच्या वागण्यामध्ये वेगळेपणा जाणवतो. 

मिळून-मिसळून खेळण्यासाठी अनुत्सकतासंवाद सुरु कसा करावा आणि तो पुढे कसा न्यावा हे ऑटीझम झालेल्या मुलांना कळत नाही. या समस्यांमुळे ऑटिझम झालेली मुलं इतर मुलांमध्ये मिळून-मिसळून खेळण्यासाठी उत्सुक नसतात. 

मुलींपेक्षा मुलांमध्ये चार पटीने अधिक प्रमाणऑटीझमचे प्रमाण मुलींपेक्षा मुलांमध्ये चार पटीने अधिक असते. विशेष म्हणजे सर्व प्रदेशातील तसेच सर्व आर्थिक-सामाजिक स्थरातील मुलांमध्ये ऑटीझम आढळतो. 

बहुतेक मुलांचे निदान वयाच्या चौथ्या वर्षानंतर ऑटिझमचे निदान वयाच्या दुसऱ्या वर्षीच केले जाऊ शकते, तरीही बहुतेक मुलांचे निदान वयाच्या चौथ्या वर्षानंतर होते. 

जलद उपचार चांगल्या भवितव्याची गुरुकिल्लीआपल्याला जरी ऑटिझमची कारणे माहीत नसली तरी जलद निदान आणि उपचार ही मुलांच्या चांगल्या भवितव्याची गुरुकिल्ली आहे हे मात्र निश्चित आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

विकासात्मक आणि वर्तनात्मक पद्धतींचा वापर जर लवकरात लवकर मिळणाऱ्या उपचार सेवेमध्ये समाविष्ट केला तर सामाजिक संभाषण संवाद कौशल्य यांच्यामध्ये नक्कीच सुधारणा होऊ शकते. विशिष्ट थेरपीमुळे ऑटीझम झालेली मुलं ही चांगल्या तर्‍हेने आयुष्य जगू शकतात. फारच अवघड वर्तन दिसत असेल तर केवळ काही स्थितींमध्येच या समस्येवर औषधोपचारांची आवश्‍यकता पडू शकते. - डॉ. अविनाश भोसले, बालरोग तज्ज्ञ, जळगाव

टॅग्स :Healthआरोग्यJalgaonजळगाव