भींत पाडली
जळगाव : कोविड रुग्णालयातील अधिष्ठाता कार्यालयासमोरील भींतीचा कोपरा ऑक्सिजन टँकचा पुरवठा करणाऱ्या वाहनाने तोडल्यामुळे शनिवारी सकाळी ही पूर्ण भींतच पाडून परिसर मोकळा करण्यात आला. या आधिही या वाहनो एक भींत पाडली होती.
खड्ड्यांमध्ये तलाव
जळगाव : शनिवारी अवकाळी पाऊस झाल्याने अनेक अंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये मोठे पाणी साचले होते. या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहनधारकांची या खड्ड्यांमध्ये तारांबळ उडाली. अंतर्गत रस्त्यांची वाट लागली असून दुरूस्ती होणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
सीसीसीत ४५ रुग्ण
जळगाव : जिल्हाभरातील कोविड केअर सेंटरमध्ये ४५ रुग्ण दाखल आहेत. लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना या ठिकाणी दाखल करण्यात येत असते. ही संख्या अनेक दिवसांपासून शंभराच्या खाली असल्याने यंत्रणा रिलॅक्स आहे.
ग्रामीणमध्ये सहा रुग्ण
जळगाव : जळगाव ग्रामीणमध्ये शनिवारी एक रुग्ण बाधित आढळून आल्याने उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ६ वर पोहोचली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही संख्या कमी अधिक होत आहे. एकत्रीत शहर व ग्रामीणच्या रुग्णांची संख्या १६० वर पोहोचली आहे.
सभेबाबत प्रश्नचिन्ह
जळगाव : २२ डिसेंबरला होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेबाबत ग्रामपंचात निवडणुकांमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ही सभा होणार किंवा नाही, याबाबत अनिश्चितता असून याबाबत मार्गदर्शन मागिवले जाणार असल्याची माहिती आहे.