पारोळा, जि.जळगाव : बोंडअळी अनुदान वितरणात अन्याय झाल्याच्या भावनेने पारोळा व एरंडोल तालुक्यातील शेतकºयांनी सोमवारपासून पारोळा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.एरंडोल व पारोळा तालुक्यातील शेतकºयांच्या बोंडअळी अनुदानाबाबत शासनाचे कोणतेही निर्देश नाही. या दोन्ही तालुक्यातील अधिकार व कर्मचारी मनमानीपणाने शेतकºयांच्या मंजूर अनुदानातून ३३ रक्कम कपात करीत आहेत. ही कपात झालेली रक्कम त्या-त्या शेतकºयांच्या खात्यावर आठ दिवसात भरावी आणि या दोषी अधिकारी व कर्मचाºयांची चौकशी करावी या मागणीसाठी शेतकºयांनी हे उपोषण आरंभले आहे.बोंडअळीच्या प्रादुभार्वाने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले होते म्हणून शासनाकडून शेतकºयांना बागायतीला हेक्टरी १३ हजार ५०० रुपये व जिरायती पिकाला हेक्टरी सहा हजारांचे अनुदान जाहीर झाले होते. जळगाव जिल्ह्यात पारोळा व एरंडोल हे दोन्ही तालुके सोडून इतर सर्व तालुक्यात मंजूर अनुदान थेट शेतकºयांच्या खात्यावर जमा झाले, पण या दोन्ही तालुक्यात मात्र ३३ टक्के रक्कम कपात करण्यात येत आहे.जिल्हा कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी, कृषी व महसूल प्रशासनाला अनुदानातून कोणतीही रक्कम कपात न करता, शेतकºयांच्या खात्यावर अनुदान जमा कारण्यास सांगितले होते. तरीदेखील पारोळा व एरंडोल तालुक्यात मात्र बोंडअळीच्या मंजूर अनुदानातून ३३ टक्के रक्कम कपात होऊनही रक्कम शेतकºयांच्या खात्यावर जमा होत आहे. यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पळासखेडे, ता.पारोळा येथील अविनाश पुंडलिक पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बेमुदत उपोषणाला बसले आहेत.ही अन्यायकारक ३३ टक्के रक्कम कपात करणे त्वरित थांबवावे, जी झालेली कपात आहे ती तत्काळ त्या-त्या शेतकºयांच्या नावे जमा करावी व दोषी अधिकारी व कर्मचारीवगाला कडक शासन करावे, अशी मागणी लावून धरत उपोषण सुरू केले आहे.या वेळी अविनाश पाटील यांच्यासमवेत बाजार समितीचे माजी संचालक पंडित पाटील, चोरवडचे वसंतराव खंडू पाटील, शहर अध्यक्ष मुकुंदा चौधरी, भारतीय युवाचे रावसाहेब गिरासे, शेतकरी वामान चौधरी, भिकन बुधा पाटील टोळी, सुनील पाटील मंगरुळ, शांताराम पवार, भगवान चौधरी, उत्तम पाटील, संतोष पाटील, लक्ष्मण ठाकूर, प्रल्हाद महाजन आदी शेतकरी या उपोषण स्थळी उपस्थित होते.जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.
पारोळा येथे शेतकऱ्यांंचे बेमुदत उपोषण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 8:15 PM