पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील पिंपळकोठा येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील बाळा उर्फ तुषार प्रदीप कदम (वय १९, रा.नवलनगर, ता.जि.धुळे) या संशयित आरोपीस पारोळा पोलिसांनी धुळे येथे सोमवारी पकडले. याआधी जगदीश अभय उदेवाल (रा.अमळनेर) यास पोलिसांनी पकडले आहे. मात्र अद्यापही तीन संशयित आरोपी फरार आहेत.पिंपळकोठा येथे यात्रेदरम्यान पूर्व वैमनस्यातून आरोपी जगदीश पाटील, तुषार प्रदीप कदम व इतर साथीदारांनी भांडण सोडवण्यास गेलेले चनेश्वर नथ्थू पाटील (वय ३०) यांच्या पोटात गावठी कट्ट््याने गोळी मारत फरार झाले होते. पारोळा पोलिसात भाग पाच, गु.र.नं. २१७/ १९, भा.दं.वि.कलम ३०७ आर्म अॅक्ट, ३/७५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. भांडण सोडविण्यास गेला याचे वाईट वाटून ही घटना २६ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० वाजता ही घटना घडली होती.घटना घडल्यानंतर यातील संशयित जगदीश अभय उदेवाल (वय १९, रा.अमळनेर) यास पोलिसांनी २८ नोव्हेंबर रोजी रात्री दहाला नाशिक येथून अटक केली आहे. यानंतर बाळा उर्फ तुषार प्रदीप कदम हा धुळे येथे फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचला व बाळा उर्फ तुषार प्रदीप कदम यास पारोळा पोलिसांनी पकडले.जगदीश उदेवाल व बाळा कदम यास पोलिसांनी पकडल्यानंतर आता अजूनही तीन संशयित फरार आहेत. त्यात जगदीश पुंडलिक पाटील (रा.पिंपळकोठा, ता.पारोळा), सागर संजय पाटील व गौरव विजय पाटील (दोन्ही रा.अमळनेर) यांचा समावेश आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे, पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पारोळा पोलीस ठाण्याचे पो.काँ.सुनील साळुखे, पो.कॉ.पंकज राठोड, किशोर भोई, दीपक अहिरे या पथकाने बाळा उर्फ तुषार कदम यास पकडून पारोळा पोलीस ठाण्यात आणले. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत आहेत.
पिंपळकोठा गोळीबार प्रकरणातील एका आरोपीस पारोळा पोलिसांनी धुळ्यात पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 4:15 PM
पिंपळकोठा येथे झालेल्या गोळीबार प्रकरणातील बाळा उर्फ तुषार प्रदीप कदम यास पारोळा पोलिसांनी पकडले.
ठळक मुद्देयाआधी एकास नाशिक येथून घेतले आहे ताब्यात अद्यापही तीन जण फरार