रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांना गुप्त बातमी मिळाली. शहरातील दोन युवक मोटारसायकली चोरी करून विक्री करत आहेत, असे सांगितले असता पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश पाटील, सत्यवान पवार, सुनील साळुंखे, किशोर भोई, दीपक अहिरे यांनी सापळा रचला.
नीलेश मराठे (२२, भोसले गल्ली, पारोळा) यांच्याकडे चोरीची मोटारसायकल आहे. ती मोटारसायकल धरणगाव बायपास रोडाजवळ विक्री करत आहे. त्याठिकाणी त्यास पकडले असता त्याच्या ताब्यातील मोटारसायकलच्या कागदपत्रांची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास पारोळा पोलीस स्टेशनला आणून खाकीचा हिसका दाखवला असता ही मोटारसायकल चोरीची आहे, असे त्याने कबूल केले व त्याच्यासोबत ज्ञानेश्वर पाटील (राजीव गांधीनगर, पारोळा) असे आम्ही दोन्ही मिळून अजून चार मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल केले. या आरोपींनी धरणगाव, चोपडा, निपाणे अशा ठिकाणांहून या मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितल्याने या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
260921\1951-img-20210926-wa0057.jpg
पारोळा पोलिसांनी पकडण्यात आलेले दोन मोटर सायकल चोर सोबत पोलीस निरीक्षक संतोष भंडारे पोलीस कॉन्स्टेबल महेश पाटील सत्यवान पवार सुनील साळुंखे किशोर भोई
छायाचित्र राकेश शिंदे