लोकमत ऑनलाईन पारोळा, दि. 7 : सात /बारा उताराच्या ऑनलाईन कामात कुचराई केल्यामुळे तालुक्यातील 4 मंडळ अधिकारी आणि 20 तलाठय़ांचे वेतन रोखण्याची कारवाई तहसीलदार श्वेता संचेती यांनी केली आहे. यासंदर्भातील नोटीसा त्यांनी संबंधीतांना बजावल्या आहेत. यातील काहींचे एक महिन्याचे तर काहींचे दोन महिन्यांचे वेतन रोखण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार पंकज पाटील यांनी दिली. पारोळा तालुक्यातील सात/ बारा संगणकीकरणाचे काम संथ गतीने सुरू असून दिलेल्या कालावधीत काम पूर्ण झाले नसल्याने जिल्हाधिका:यांनी तहसीलदार यांना धारेवर धरत त्यांचे दोन वेतन रोखण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. त्यामुळे तहसीलदार श्वेता संचेती यांनीदेखील कारवाईचा बडगा उचलत पारोळा, बहादरपूर येथील एस.पी.शिरसाठ, शेवगे येथील पी.ए.पाटील,चोरवड येथील बी.टी.पाटील, आणि तामसवाडी येथील जी.एल.पाठक हे मंडळाधिकारी आणि पारोळा येथील तलाठी बी.यु.बाविस्कर, म्हसव्याचे घनश्याम पाटील, उंदिरखेडे येथील मोनिका मोरे, मुंदाणे-मेहुटेहूचे एन.जी.बागड, धूळपिंप्रीचे के.एम.खांडेकर, तामसवाडी-बोळे येथील टी. एल.शिंदे, टोळी-देवगाव येथील अशोक शेळके, आडगाव-शिवरेचे रवी दिवठाणे, करमाडचे सुनील कोळी, र}ापिंप्री-नेरपाटचे गौरव लांजेवार, बहादरपूरचे राकेश राठोड, जिराळी-भोलाणे येथील सुभाष वाघमारे, दळवेलचे महेशकुमार सोनवणे, चोरवड येथील बोपचे, टिटवीचे काळे, सावखेडे होळ येथील -अकोलनेरकर, विटनेरच्या श्रीमती खंदाने, वाघरा वाघरी येथील सुवर्णा पाटील यांच्यावर कामात कुचराई केल्याबद्दल त्यांचे दोन वेतन रोखण्याची कारवाई केली आहे. दरम्यान, शेवगे- आंबापिंप्रीचे सातप्पा पाटील, शेळावे-राजवडचे- निशिकांत पाटील, हिरापूर-खेडीढोकचे अतुल तागडे या तीन तलाठयांचे काम 100 टक्के पूर्ण झाल्याने त्यांच्यावर कुठलीही कारवाई न होता त्यांचे अभिनंदन करण्यात आल्याचेही नायब तहसीलदार म्हणाले. सव्र्हर डाऊनमुळे कामात व्यत्यय दरम्यान, सात/ बारा संगणकीकरणाच्या कामात सव्र्हर नेहमी डाऊन होत असल्याने व्यत्यय येत आहे. त्यात चार चार गावांच्या अतिरिक्त कारभाराची जबाबदारी डोक्यावर असल्यामुळे कामात अडचणी निर्माण होत असल्याचे अनेक तलाठय़ांनी सांगितले.
पारोळा तालुक्यातील 4 मंडल अधिकारी व 20 तलाठय़ांचे वेतन रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 8:04 PM
सात/ बारा ऑनलाईन कामातील कुचराई करणा:या कर्मचा:यांवर तहसीलदार श्वेता संचेती यांनी कारवाईचा बडगा उगारल्याने महसूल कर्मचा:यांचे धाबे दणाणले आहे.
ठळक मुद्देजिल्हाधिका:यांनी रोखले होते पाच तहसीलदारांचे वेतनतालुक्यातील अवघ्या तीन तलाठय़ांचे कौतुकास्पद कार्य