एरंडोल, जि. जळगाव : एरंडोल बस आगारातील काही बसेस् जळगाव येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आल्याने १५ दिवसांपासून एरंडोल बस स्थानकातून दररोज चार ते सहा फेºया रद्द कराव्या लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. बसेस्अभावी प्रवासी खाजगी व अवैध प्रवासी वाहनाकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे.एरंडोल बस आगारात एकूण ६३ बसेस् असून त्यापैकी १० बसेस् १५ दिवसांपासून तपासणीसाठी जळगाव येथे पाठविण्यात आल्या आहेत. परिणामी बसेस्चा तुटवड्यामुळे रोज ४ ते ६ फेºया रद्द कराव्या लागतात. यामुळे परिवहन महामंडळाचे रोजचे उत्पन्न बुडण्यासह व प्रवासी वर्गाचेही हाल होत आहे.खाजगी प्रवासी वाहनधारकांची चांदीखाजगी व अवैध प्रवासी वाहतुकीने एरंडोल बस स्थानकाला गराडा घातला असून त्यांचे उत्पन्न व स्थानकाच्या उत्पन्नाशी स्पर्धा करणारे ठरत आहे. गेल्या काही वर्षांपासून बस स्थानकावर प्रवासी संख्येत प्रचंड घट झालेली आहे. त्यात बसेस्च्या नियमित फेºया रद्द झाल्या की प्रवासी एस.टी. पासून लांब जातात.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात तपासणीसाठी बसेस् अडकल्याने प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 9:19 PM