भुसावळ : पाटलीपुत्र या गाडीने प्रवास करत असताना घाई गरबडीत गाडीतच विसरलेला मोबाईल लोहमार्ग पोलिसांनी परत केला.संजय जंजाळकर रा.भवानीनगर, भांडुप, पूर्व मुंबई हे १० रोजी त्यांच्या वयोवृद्ध आईसोबत गाडी नंबर ०२१४१ पाटलीपुत्र एक्सप्रेस ठाणे ते जळगाव असा प्रवास करीत होते. जळगाव रेल्वे स्टेशनवर घाईगरबडीत आईस घेऊन उतरले. तेव्हा त्यांचा १० हजारांचा मोबाईल हा कोच क्रमांक-८, बर्थ नंबर -२८ वर राहून गेला. यामुळे स्टेशन मास्टर यांनी ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना दिल्यानंतर रेल्वे स्टेशन भुसावळ येथे पोलीस हवालदार सुधीर पाटील, महिला पोलीस नाईक अर्पणा गेडाम यांनी तत्परता दाखवली. ही गाडी अटेंड करून कोचची पाहणी केली. तेव्हा मोबाईल मिळून आला. प्रवासी जंजाळकर यांना पोलीस निरीक्षक दिनकर डंबाळे यांनी तो मोबाईल परत केला. या प्रवासाने पोलिसांचे आभार मानले व कौतुक केले.
पाटलीपुत्र गाडीतील मोबाईल केला परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 6:18 PM
पाटलीपुत्र या गाडीने प्रवास करत असताना घाई गरबडीत गाडीतच विसरलेला मोबाईल लोहमार्ग पोलिसांनी परत केला.
ठळक मुद्देभुसावळ लोहमार्ग पोलिसांचे प्रयत्नप्रवाशाने पोलिसांचे मानले आभार