जळगाव : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन दरम्यान नागरिकांनी आपापल्या भागातच व पायी जाऊनच दूध व औषध खरेदी करावी, असे निर्देश असतानाही लॉकडाऊनच्या दुसºया दिवशी मात्र नागरिक थेट दुचाकीवर बाहेर पडल्याचे चित्र शहरात दिसून आले. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी चांगला संयम दाखविलेला असताना दुसºया दिवशी मात्र काही नागरिकांमुळे शहराच्या विविध रस्त्यांवर दुचाकी व इतर वाहने आल्याने तुरळक वर्दळ दिसून आली. यामुळे लॉकडाऊनच्या उद्देशाला खीळ तर बसणार नाही ना, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ७ ते १३ जुलै दरम्यान शहरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. या काळात दूध व औषधी व्यतिरिक्त इतर जीवनाश्यक वस्तूंचे व्यवहारही बंद ठेवण्याचे आदेश आहेत. यामध्ये दूध व औषधी खरेदीही आपापल्या भागातच व पायी जाऊनच करावी, असे स्पष्ट निर्देश आहेत. तरीदेखील लॉकडाऊनच्या दुसºयाच दिवशी नागरिक दुचाकीचा वापर करून बाहेर रस्त्यांवर फिरत असल्याचे चित्र होते. यामध्ये काही कर्मचारी असले तरी इतर काहीजण दुचाकी घेऊन दूध केंद्र व औषधी दुकानांवर जात असल्याचे चित्र पहायला मिळाले. अनेकजण तर रस्त्याच्या बाजूला दुचाकी लावून गप्पा मारत असल्याचेही चित्र होते.पोलिसांची ढिलाईमू.जे. महाविद्यालय ते वाघनगर थांब्यापर्यंत दुचाकींचा वावर होत असताना व अनेकजण दुचाकीवर दोनजण (डबल सीट) जात होते. हे सर्व दिसत असले तरी ठिकठिकाणी तैनात असलेले पोलीस अशा दुचाकींना अडवित नव्हते की त्यांची वितारणा करीत नव्हते.त्यामुळे लॉकडाऊन खरोखर यशस्वी करीत कोरोनाची साखळी तोडायची असल्यास दुचाकी व इतर वाहनधारकांची पहिल्या दिवसाप्रमाणेच चौकशी करण्यात यावी, असा सूर उमटत आहे.गणेश कॉलनीतही हीच परिस्थिती होती. गणेश कॉलनी चौक ते ख्वाजामियाँ चौकापर्यंत दिवसभर तुरळक वाहतूक सुरू होती. पोलीस असूनही तपासणी होत नव्हती.अनेकांना परतवले़़़दुसºया दिवशी एकाच वाहनावर दोनजण फिरताना दिसून आले़ गणेश कॉलनी परिसरातील ख्वॉजामियाँ दर्ग्याजवळ पाच ते सहा पोलिसांकडून प्रत्येकाची चौकशी केली जात होती़ अत्यावश्यक असल्यावरचं त्या वाहनधारकास शहराकडे जाऊ दिले जात होते़ तर अनावश्यकरीत्या फिरणाºयांवर कारवाई केली जात होती़ काहींना तंबी देऊन घराच्या दिशेने परवले़ परंतु, बुधवारी काही प्रमाणात रहदारी वाढल्याचे बघायला मिळाले़ काही वाहनधारक मेडिकल फाईल बाळगून फिरताना दिसून आले़ दरम्यान, पिंप्राळा रस्त्यावर बुधवारी दुपारी वाहनांची आणि ये-जा करणाºयांची तुरळक वर्दळ पहायला मिळाली. गणेश कॉलनी चौकात वर्दळ नव्हती पण येणारे - जाणारे होते. काहीजण वाहनांवर तर काहीजण पायी होते. रिंगरोडवर दुपारी थोडी जास्त वर्दळ पहायला मिळाली. अनेक मोठी वाहने येताना दिसत होती.वाहनधारकांची तपासणी-लॉकडाऊनच्या दुसºया दिवशीदेखील सकाळपासून शहरातील शिवतीर्थ मैदान, टॉवर चौक व चित्रा चौकात पोलिसांचा ताफा दिसून आला. रस्त्यावर उभे राहून प्रत्येक वाहनधारकाचे ओळखपत्र व कामाची चौकशी करताना दिसून आले. जे अत्यावश्यक सेवेत आहेत, त्यांनाच पुढे जाण्याची परवानगी देण्यात येत होती. तसेच ज्यांच्याकडे कुठलेही ओळखपत्र नाही, अशांना मात्र माघारी पाठविण्यात येते होते.-विशेष म्हणजे लॉकडाऊन मध्ये फक्त अत्यावश्यक सेवेलाच परवानगी असली तरी, टॉवर चौकात कांचननगरकडून येणाºया नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत होती. त्यामुळे या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच नेहरू चौकाकडून टॉवरकडे जाताना एका बाजूचा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आला होता.-यावेळी पोलिसांनी विनाकारण दुचाकी घेऊन फिरणाºयांना ताब्यात दंडात्मक कारवाईदेखील करताना दिसून आले. रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता.
पहिल्या दिवशी संयम, दुसऱ्या दिवशी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 12:50 PM