शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
TATA IPL Auction 2025 Live: १८२ खेळाडूंचा लिलाव, ६३९ कोटींच्या लागल्या बोली... वाचा, दोन दिवसांत काय-काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

नातेवाईकांकडूनच सुरु होती रुग्णांची सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 11:52 AM

जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीदरम्यान धक्कादायक प्रकार उघड : नातेवाईकाला बाहेर काढत रुग्णालय प्रशासनाला विचारला जाब

जळगाव : कोविड रुग्णालयात नातेवाईकांकडूनच रुग्णांची सेवा होत असल्याचा गंभीर प्रकार थेट जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या पहिल्याच पाहणीत समोर आला़ नातेवाईकांना का सेवा करावी लागतेय? नातेवाईक थेट रुग्णालयात कसे येतात? असा जाब त्यांनी अधिष्ठातांसह डॉक्टर्सना विचारला व वडिलांची सेवा करीत असलेल्या तरूणाला विचारपूस करून कक्षाच्या बाहेर जाण्यास सांगितले़जिल्हाधिकारी राऊत यांनी शुक्रवारी दुपारी कोविड रुग्णालयात जवळपास सर्वच कक्षात पाहणी केली़ सुमारे सव्वा तास त्यांनी सर्व कक्ष पिंजून काढत सर्वांची सविस्तर माहिती घेतली़ यानंतर त्यांनी पंधरा मिनिटे अधिष्ठाता डॉ़ जयप्रकाश रामानंद यांच्या कार्यालयात बैठकही घेतली़ यावेळी प्रशासक डॉ़ बी़ एऩ पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ़ दत्तात्रय बिराजदार, डॉ़ मारूती पोटे, डॉ़ मधुकर गायकवाड, नोडल अधिकारी डी़ आऱ लोखंडे, अधिसेविका सविता अग्निहोत्री आदी उपस्थित होते़ जिल्हाधिकारी राऊत यांनी सुरूवातीलाच कक्ष एक मध्ये भेट दिली़ या ठिकाणी मस्टर तपासले, सीसीटीव्हीबाबत विचारणा केली़ ते पाहणी करीत असताना रुग्ण ताटकळले होते़ स्वच्छतागृहांची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली़ महिलेचा मृत्यू झालेल्या जागेवरही त्यांनी पाहणी केली़अधिष्ठतांच्या कार्यालयात घेतला आढावाजिल्हाधिकाºयांनी अधिष्ठाता कार्यालयात आढावा घेतला़ सुक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ़ किशोर इंगोले यांच्याकडून प्रयोगशाळेसंदर्भात त्यांनी माहिती घेतली़ तपासण्या वाढविण्यासाठी काय करता येईल? तपासण्यांची गती वाढविण्यासाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी विचारणा केली़ किमान दोन दिवसात अहवाल आल्यास रुग्णांची गर्दी कमी होईल, असेही त्यांनी सांगितले़पोलीस फोर्स नेमा, मात्र नातेवाईक येता कामा नयेकक्ष दहा मध्ये पाहणी करीत असताना संशयित रुग्ण असलेल्या आपल्या वडिलांना एक तरूण जेवण भरवत होता़ जिल्हाधिकारी राऊत यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी याबाबत विचारणा केली़ त्यावेळी सर्वच अवाक् झाले़ त्यांनी तातडीने त्या तरूणाला बोलावून विचारपूस केली व रुग्णालय प्रशासनावर काहीशी नाराजीही व्यक्त केली़ नातेवाईक येतील, बाहेर जातील व बाहेर अधिक संसर्ग वाढेल़ त्यामुळे पोलीस आणा, मात्र नातेवाईक आत येता कामा नये, अशा सूचना त्यांनी दिल्या़ सुरक्षा यंत्रणा कशी याबाबतही त्यांनी माहिती घेतली़ अन्य रुग्णांशीही त्यांनी सवाद साधला़रुग्णवाहिका नसल्याने रुग्ण हलविता येईनाकोविड रुग्णालयात क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण येत असल्याने ताण वाढला आहे़ अशा स्थितीत कक्ष १३मधील २२ बाधित रुग्ण हे गोदावरी रुग्णालयात हलवायचे आहेत. मात्र, डॉक्टर्स व रुग्णवाहिकाच नसल्याने हा विषय प्रलंबित असल्याची माहिती डॉक्टरांनी यावेळी दिली़ हा कक्ष मोकळा झाल्यास या ठिकाणी संशयितांना ठेवता येईल, असे या डॉक्टरांनी सुचविले़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव