लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : म्यूकरमायकोसिसचे एम्फोटेरिसीन बी इंजेक्शन मिळत नसल्याने डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील काही रुग्णांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवदेन दिले आहे. शस्त्रक्रिया झाल्या मात्र, इंजेक्शन उपलब्ध नसल्याने पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागते की काय अशी भीती असल्याचे येथील रुग्णांनी म्हटले आहे. ३ जून रोजी रुग्णांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. निवेदनावर २३ रुग्णांच्या स्वाक्षरी आहेत.
जिल्हाभरात एम्फोटेरिसीन बी इंजेक्शनच तुटवडा पुन्हा समोर आला आहे. यात शासकीय यंत्रणेत प्राधान्याने हे इंजेक्शन देण्याचे शासनाचे आदेश आहे. त्यानुसार याचे नियंत्रण हे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे देण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून इंजेक्शनचा पुरवठा नव्हते, शुक्रवारी जिल्ह्यात १५० इंजेक्शन प्राप्त झाले आहेत. दरम्यान, आम्हाला हे इंजेक्शन तातडीने उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी रुग्णांनी निवेदनात केली आहे.
कोट
जिल्हाभरात एम्फोटेरिसीन बी या इंजेक्शनचा काही दिवसांपासून पुरवठा नव्हता, त्यामुळे कुठेच ते उपलब्घ न होते. शु्क्रवारी सायंकाळी १५० इंजेक्शन शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झाल्यानंतर त्यातील ५० इंजेक्शन हे डॉ. पाटील रुग्णालयात देण्यात आले. - डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक
जीएमसीत तंतोतंत साठा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शनिवारी म्यूकरमायकोसिसचे तीन संशयित रुग्ण दाखल झाले. यात दोघांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यानंतर या रुग्णांवर म्यूकरचे उपचार करण्यात येणार आहेत. दरम्यान, जीएमसीत अत्यंत तंतोतत साठा उपलब्ध आहे. मात्र, रुग्णांच्या उपचारात खंड नसल्याची माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे यांनी दिली.