दुपारी चारनंतर देखील बाजारात गर्दी होत आहे. कठोर कारवाई होत नसल्याने दुकानदारांमध्ये भीती राहिलेली नाही. अर्धे शटर, शटर बंद करून दुकानात गर्दी आणि अत्यल्प दंड केला जात असल्याने दुकानदार देखील दंड भरू; पण दुकान सुरू, अशी भूमिका घेत आहेत. अखेर पालिकेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, पाणी पुरवठा अभियंता अमोल भामरे, विद्युत अभियंता प्रशांत ठाकूर, अतिक्रमण विभागप्रमुख राध्येश्याम अग्रवाल, प्रसाद शर्मा व इतर कर्मचाऱ्यांनी बाजारात दुकानदारांना चार वाजेपासून दुकाने बंद करण्याची सक्त ताकीद दिली, तरीदेखील दुकाने सुरू ठेवणारे रॉयल फुटवेअर, आबा मोरे, सचिन ड्रेसेस, भारत सायकल मार्ट, संदीप पाटील, इंडियन हार्डवेअर, सोनल सोनार, तुषार सोनवणे यांच्यावर पालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे.
दंड भरू आणि दुकान सुरू, व्यापाऱ्यांची शक्कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:19 AM