शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

बोदवड येथे वृक्ष संवर्धनातून मृतात्म्यालाही लाभतेय शांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 6:04 PM

बोदवड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ‘मुक्तीधाम’ स्मशानभूमीत गोरक्षनाथ संस्थेने वृक्ष लागवडच नव्हे तर त्यांचे संवर्धन केल्याने ते दिमाखात डोलत आहेत. यामुळे मुक्तीधाममध्ये आलेल्यांना सर्वांना मोठा दिलासा मिळत आहे.

ठळक मुद्देपर्यावरण दिन विशेषबोदवडला ७० झाडे जगवून २० वर्षांपासून करताहेत जतनत्र्यंबक तेली व सहकाऱ्यांचे योगदान

गोपाळ व्यासबोदवड, जि.जळगाव : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ‘मुक्तीधाम’ स्मशानभूमीत गोरक्षनाथ संस्थेने वृक्ष लागवडच नव्हे तर त्यांचे संवर्धन केल्याने ते दिमाखात डोलत आहेत. यामुळे मुक्तीधाममध्ये आलेल्यांना सर्वांना मोठा दिलासा मिळत आहे.शहरातील ‘मुक्तीधाम’मध्ये गत २० वर्षांपूर्वी सन १९९९ मध्ये गोरक्षनाथ संस्थेने झाडे लावून ती जगवण्यासाठी पुढाकार घेतला. याशिवाय याच ‘मुक्तीधाम’ला कूपनलिका करून दिली. आजूबाजूला खड्डे खोदून सुमारे शंभर झाडे लावण्यात आली. त्यात सर्वाधिक निंब, वड, पिंपळ, शिसम, नारळाची, पिपरी तसेच काही फुलझाडे लावण्यात आली. या झाडांना सुरवातीला जगवण्यास फार अडचण आली. कारण स्मशानभूमीच्या जागेत एका फुटावर मुरुम लागत असल्याने झाडे जगवण्यास अडचण येत होती. त्यावर काळी मातीचा भरणा करून गोरक्षनाथ संस्थेने मात केली. यादरम्यान बाजूला वाहत जाणाºया गटारीच्या पाण्याने काही झाडे सडली तर काही जळाली. परंतु जिद्दीने परत झाडे जगवण्यासाठी शहरातील गुजराथी नामक व्यक्तीने मुक्ताईनगर वनविभागाच्या नर्सरीतून ही झाडे आणून दिली व आजघडीला ७० झाडे डौलाने जगत आपल्या गर्द सावलीने मृत आत्म्याच्या शांतीसाठी येऊन बसणाऱ्यांनाही ‘जीवाची काहिली क्षणभर सावली’ देऊन मनशांती देत आहे.त्र्यंबक तेली व सहकाºयांचे योगदानयेथील सेवाधारी त्र्यंबक तेली व त्यांचा सहकारी योगेश दैवे हे दोन्ही नित्याने आजही झाडांना पाणी देऊन त्यांची देखरेख करीत असतात. काही झाडे जळण्याच्या स्थितीत आल्यास त्यांना वाचवण्यासाठीही ते प्रयत्न करीत असतात. छोट्या झाडांना सुरक्षा कवच लावले असून अजून सुमारे तीस झाडे लावून जगवण्याचा त्यांनाच मानस आहे. त्यांच्या मेहनतीचे फळ आज झाडे २० वर्षांची झाली आहेत. उन्हात या झाडाच्या गर्द सावलीत दुपारी आसरा घेतात.याबाबत संस्थेच्या वतीने मिळत असलेल्या योगदानामुळेही झाडे जगवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले असून, आज झाडे जगल्याने समाधान वाटत असल्याचे त्र्यंबक तेली यांनी सांगितले. या कामी संस्थाध्यक्ष विजय बडगुजर जातीने लक्ष देतात, असेही सांगितले.

टॅग्स :environmentवातावरणBodwadबोदवड