पारोळा : पारोळा ते नेमावर शांती सदभावना यात्रेस पारोळा येथून उत्साहात प्रारंभ झाला. २९ रोजी दुपारी ३.४५ वाजता हत्ती गल्लीतील दिगंबर जैन मंदिरापासुन शांती यात्रेस ढोलताशांच्या गजरात सुरुवात झाली.चातुर्मासासाठी विराजमान असलेले मुनिश्री अक्षयसागरजी महाराज, मुनिश्री नेमिसागरजी महाराज, क्षुल्लक श्री समताभुषणजी महाराज यांच्यासह जैन समाजबांधव सहभागी होते. प्रत्येकाने खादीची टोपी परिधान केली होती. पदयात्रा गणपती चौक, रथ चौक, गावहोळी चौक, क्रांती चौक, आझाद चौकातून धरणगाव रस्त्याने मार्गस्थ झाली.बालब्रम्हचारी तात्याभैया यांच्या मार्गदर्शनाने यात्रा सुरु झाली. यात दिलीप घेवारे, महाविर अष्टगे, अभय बरगाले, किरण सिदनाळे, डॉ.शीतल पाटील, प्रितम दमोपुरे, महाविर पाटील, संतोष पांगळ, पवन अंबुरे, अमर गांधी यांच्यासह परराज्यांतून भाविक सहभागी झाले आहेत.
धरणगावला जल्लोषात स्वागतधरणगाव : येथे पदयात्रचे ३० रोजी आगमन झाले. यावेळी स्वागत चंदन तिलक लावून समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन जैन, डॉ.मिलिंद डहाळे, चिमनलाल जैन, प्रतीक जैन, उदय डहाळे, सावन जैन यांनी केले. तसेच राहुल जैन, संजीव जैन, अजित डहाळे, राजेश जैन, सुभाष जैन, श्रेयान्स जैन, निकेत जैन, नितीन जैन यांनी पुष्पर्पण केले. धरणगाव आणि अरुणावती(एरंडोल)चा संक्षिप्त इतिहास मोहन जैन यांनी कथन केला. महावीर अष्टगे यांनीही समाजास उद्बोधन केले.