अमळनेर: पावसाळ्यात बोरी नदीतून धार पाझर तलावाचे ब्रिटिशकालीन बंधाºयाचे चारीद्वारे पुनर्भरण करा या वर्षभरापासून प्रलंबित मागणीसाठी धार सह डझनभर गावातील शेतकºयांनी प्रांताधिकारी कार्यालयावर सुमारे ८० बैलगाड्यांचा मोर्चा आणला. कागदोपत्री परवानग्या मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा माघारी फिरला.तालुक्यातील बोरी नदीवरील फापोरे ते पिंपळे नाला पाटचारीत १९७० च्या जवळपास कालावधीत अमळनेर शेतशिवाराला पाणी दिले जात होते. तो पुनर्वापर करून धार पाझर तलाव भरावा यासाठी हे आंदोलन होते. या पद्धतीने बुजलेल्या पाटचाºया खोलीकरण करून पावसाळ्यात वाहून जाणाºया पाण्याद्वारे पुनर्भरण करता येईल. हे अंतर ४ ते ५ किमी येईल व जुनी पाटचारी पोकलँड मशिनद्वारे खोदून जवळपास अंदाजे ४४ लाख रुपयांपर्यंत खर्चाचा सर्व्हे करून अंदाज पत्रक गिरणा पाटबंधारे खात्याने केले आहे.हे काम थ्री आर या योजनेत समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर आंदोलन होणार याची माहिती असतानाही गिरणा पाटबंधारे कार्यकारी अभियंता व त्यांच्या खात्याने दिरंगाई केल्याने हा मोर्चा निघाला, असा आरोप यावेळी आंदोलन समितीचे अध्यक्ष प्रा. गणेश पवार, फाफोरे सरपंच जितेंद्र पाटील, धारचे सरपंच एच.एस.पाटील, अंबारे सरपंच सतीश पाटील, पंचायत समिती सभापती शाम अहिरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, गणेश धोंडू पाटील यांनी केला आहे.... आणि आंदोलनकर्ते संतापलेकार्यकारी अभियंता यांनी चक्क आता हा प्रस्ताव नियोजन विभाकडे पाठवला आहे, अशी माहिती मिळताच यामुळे आंदोलनकर्ते चिडले होते. यावर तहसिलदार ज्योती देवरे यांच्या दालनात सचिन पाटील, गिरणा पाटबंधारे उपअभियंता एस.आर मिठे, कनिष्ठ अभियंता अजिंक्य पाटील एस. आर. शिंपी, लिपिक एस. आर. पाटील, निम्न तापी प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता व्ही.एस.ठाकुर, पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी याबाबत थेट राज्यस्तरीय नियोजन सचिव यांना संपर्क साधत याबाबत चर्चा केली असता रविवार पर्यंत माझ्याकडे प्रस्ताव आलेला आहे. लवकर वित्त विभागाकडे पाठविण्यात येईल असे संगितले. कार्यकारी अभियंता यांनी लवकर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी आंदोलकांचे समाधान झाले. व ११ ते तब्बल अडीच वाजेपर्यंत भर उन्हात शेतकरी बैलगाड्याा सोडून आश्वासनाची प्रतीक्षा करत उभे होते. तहसिलदार देवरे यांनी बैलांसाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था गटविकास अधिकारी स्ंनदिप वायाळ यांना बोलावून केली.दहा वेळा आंदोलने केली होती स्थगीतगेल्या काही दिवसांपासून दहा वेळा आंदोलने स्थगित करीत शेतकरी कार्यवाहीची वाट पाहत होता. मात्र या गिरणा पाटबंधारे विभागाने कशाचीही तमा न बाळगता दिरंगाई केली. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले व बैलगाड्या आणून प्रांताधिकारी कार्यालयावर सोडण्यात आल्या. यावेळी बैठकीत अधिकाºयांची चांगलीच झाडाझडती मोर्चेकºयांनी घेतली. आम्हाला पिण्यासाठी तरी पाणी उपलब्ध होईल यासाठी तरी प्रयत्न करा, असे सुनावले.बैलगाड्यांवर पाण्याचे रिकामे ड्रमबैलगाडीवर खाली पाण्याचा ड्रम, चारा असे साहित्य होते. तसेच या आंदोलनासाठी चक्क प्रांत कार्यालयात बैलगाड्या आणून सोडल्या होत्या. व शेतकर्यांनी उपोषण सुरु केले होते. याबाबत गिरणा पाटबंधारे कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा करीत तहसिलदार देवरे या प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत होत्या. सदर काम थ्री आर योजनेत समाविष्ट झाल्याने ते थेट राज्य समितीपर्यंत पोहचते. यात दिरंगाई झाली नसती तर मोर्चा निघाला नसता. असा सूर आंदोलनकर्त्यांनी काढला. यामोर्चात हंडे घेवून महिलाही सहभागी झाल्या होत्या.आजपासून सुरु होणार लोकसहभागातून चारीचे कामशासन करेल तेव्हा करेल मात्र तोपर्यंत पावसाळा सुरू झाला तर फायदा नाही ही बाब हेरून लोकसहभागातून हे काम सुरू करण्याची सूचना तहसिलदार देवरे यांनी केली. त्यावर सकारात्मक चर्चा होऊन सर्वजण या बाबीला राजी झाले. यासाठी मारवड विकास मंचच्या जेसीबीद्वारे चारी खोदकाम सुरू केले जाणार आहे. ४ मे पासून हे काम नारळ वाढवून पाटबंधारे खात्याच्या अधिकºयांसमोर सुरू करण्यात येणार आहे. यात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी डिझेल आणि ड्रायव्हरसाठी ११ हजार रुपये देण्याचा संकल्प केला. तर अजून काही जणांनी मदत करण्याचे आश्वासन दिले. यात अडणारी अतिक्रमणे देखील हटवण्यात येतील अशी चर्चाही यावेळी करण्यात आली. कायम प्रश्नावर लोकसहभाग तोडगा काढत तहसिलदार देवरे यांनी या विषयाला गती दिली. यामुळे मोर्चेकºयांनी देवरे यांचे आभार मानले. व १५ दिवसात चारी तयार होईल याबाबत प्रयत्न करण्यात येणार आहेत
धार तलाव पुनर्भरणसाठी शेतकऱ्यांचा अमळनेर येथे बैलगाड्यांसह मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 5:23 PM