ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.29- भुसावळ रेल्वे स्टेशनवर गाडी थांबली असता नाश्त्यासाठी काही घेऊन येतो असे प}ीला सांगून गेलेले पी.टी.जोसफ (वय 65, रा.गुडगाव, हरियाणा) हे रेल्वेत आरक्षित सीटवर परत आलेच नाहीत, त्यामुळे त्यांचे नेमके काय झाले या विवंचनेत अडकलेल्या कुटुंबियांची जोसफ यांच्या शोधासाठी गेल्या आठ दिवसापासून पायपीट सुरु आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावरील अर्धा महाराष्ट्र पालथा घातल्यानंतरही त्यांचा शोध लागलेला नाही.
याबाबत नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, पी.टी.जोसफ व त्यांची प}ी सोसामा हे दोघ ेजण 21 मे रोजी कर्नाटक एक्सप्रेसने (क्र.12628) मथुरा येथून बेंगलोरला जात असताना 22 मे रोजी दुपारी 1.47 वाजता ही गाडी भुसावळ स्थानकावर आली.
तेव्हा ते गाडीच्या खाली उतरले असता ते गाडी सुरु झाली तरी परत आले नाही. विशेष म्हणजे ते सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी आहेत.