नशिराबाद : हिंदू-मुस्लीम धार्मिक व सामाजिक एकात्मतेचे प्रतीक व सुमारे ११९ वर्षाची अखंड परंपरा असलेल्या पीर यासीन मियाँ कादरी यांचा उरूस सुरू असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा साधेपणाने साजरा होत आहे. यानिमित्त दरवर्षी होणारा मुशायरा, कुस्त्यांची दंगल, कव्वाली आदी कार्यक्रम रद्द करण्यात आले. शनिवारपासून ऊरूस सुरू आहे. दर्ग्यावर आकर्षक विद्युत रोशणाई करण्यात आली आहे. भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे.
नशिराबादला चौपाल मोहल्ल्यात यासीन मियॉ कादरी यांचा दर्गा आहे. या दर्ग्याच्या परिसरात चार दिवस यात्रा भरते. धार्मिक एकात्मतेचे प्रतीक असलेल्या ऊरूसात हिंदू-मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन मनोकामनापूर्तीसाठी दर्ग्यावर दर्शनाला येतात व नवसही करतात. त्यांच्या कामनापूर्ती झाल्याचा अनुभव भाविक सांगत असतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने उरूस साजरा होत आहे.