आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २७ - शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी असतानाही या वस्तू विद्यार्थ्यांना सर्रास विक्री करणाºया चार दुकानदारांविरुद्ध रविवारी रात्री ११ वाजता रामानंद नगर पोलिसांनी कारवाई केली. खटला दाखल करुन चौघांना न्यायालयात पाठविले असता न्यायालयाने प्रत्येकी ७०० रुपयांचा दंड ठोठावला.लोकेश रघुनाथ मराठे, उदय रामराव पाटील, धनराज राजू गवळी व सुभाष चुनीलाल भावसार यांचा यात समावेश आहे. शासन व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शाळा व महाविद्यालयाच्या एक हजार मीटर परिसरात, वीडी, तंबाखू, गुटखा यासह तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी आहे. मू. जे. महाविद्यालय परिसरातील महाराजा पान सेंटर, स्रॅक्स व कोल्ड्रींक्सचे दुकान, दूध विक्री केंद्र व चहाच्या टपरीवर अशा वस्तूंची विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात असल्याची तक्रार रामानंद नगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्याकडे आली होती.या तक्रारीची दखल घेत रोहोम यांनी सहायक फौजदार गोपाळ चौधरी, प्रदीप चौधरी, शरद पाटील, विलास शिंदे व सागर तडवी यांच्या पथकाला कारवाईसाठी रवाना केले होते. त्यानुसार या पथकाने रविवारी रात्री ११ वाजता या चार विक्रेत्यांवर कारवाई केली. प्रदीप चौधरी यांच्या सरकारी फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करुन न्यायालयात खटला पाठविण्यात आला होता.शाळा, महाविद्यालय परिसरात सर्रास विक्रीन्यायालयाचे आदेश असले तरी हे आदेश डावलून शाळा व महाविद्यालय परिसरात सर्रासपणे तंबाखूजन्य वस्तूंची विक्री केली जाते. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयानेही या विषयावर चिंता व्यक्त केली होती. गोळ्या बिस्कीटच्या नावाखाली विडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा अशा वस्तूंची शहरात प्रत्येक पानटप-यांवर विक्री केली जाते. शहरातील बहुसंख्य शाळा, महाविद्यालय परिसरात गुटखाची विक्री होते. काही महिन्यापूर्वी उत्तर महाराष्ट विद्यापीठातही चर्चासत्र झाले होते. त्यातही या विषयावर चिंता व्यक्त करण्यात येऊन पोलीस तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्तपणे अशा विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती. या चर्चासत्राला उपस्थित असलेल्या पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता ही पहिल्यांदाच कारवाई झाली आहे.शाळा व महाविद्यालयापासून एक हजार मीटरपर्यंत तंबाखूजन्य वस्तू विक्री करता येत नाही. त्यासाठी २००३ मध्ये स्वतंत्र कायदाच अस्तित्वात आला आहे. या कारवाईनंतर आता अन्य ठिकाणी देखील कारवाईला वेग दिला जाणार आहे.-बी.जी.रोहोम, पोलीस निरीक्षर्क
जळगावात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या ४ दुकानदारांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 1:10 PM
महाविद्यालय परिसरातील पहिलीच कारवाई
ठळक मुद्देशाळा, महाविद्यालय परिसरात सर्रास विक्रीरात्री ११ वाजता कारवाई