भुसावळ,दि.19- रेल्वेच्या लोको शेडमधील भंगाराला बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मोठी आग लागल्याने यंत्रणेची मोठी धावपळ उडाली़ स्थानिक नगरपालिकेच्या तीन बंबांनी मोठय़ा शर्थीने आगीवर नियंत्रण मिळवल़े
रेल्वेच्या लोको (ए़सी़कन्डमनेशन एरिया)शेड भागातील स्क्रॅब मटेरियलसह इलेक्ट्रीक इंजिनमधील रबरी भंगार साहित्याला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आग लागली़ या आगीत मोठय़ा प्रमाणावर भंगार जळाले तसेच रिकाम्या जागेवरील झाडे-झुडुपे जळून खाक झाली़ नगरपालिकेच्या अगिAशमन विभागाला कळवल्यांनतर अगिAशमन दलाचे प्रवीण मिठे, शंकर रिझल, प्रवीण कोळी, डिगंबर येवले यांच्यासह आरपीएफ कर्मचारी चाँद खान यांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल़े घटनास्थळी असिस्टंट डिव्हीजन मेकॅनिकल इंजिनिअर जी़आऱअय्यर, सिनिअर सेक्शन इंजिनिअर विरेंद्रकुमार गुप्ता, रेल्वे सहाय्यक सुरक्षा आयुक्त चौधरी व सुरेशचंद्र, लोकोचे निरीक्षक घनश्याम यादव, आरपीएफ गुप्त वार्ता विभागाचे एस़स्वामी आदींनी घटनास्थळी धाव घेतली़