शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
3
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
6
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
7
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
8
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
9
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
10
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
11
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
13
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
14
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
15
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
16
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
17
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
19
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
20
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...

‘अनलॉक’नंतर भुसावळात आज ‘जनता कर्फ्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 11:25 PM

लॉकडाऊननंतर अटी, शर्तीवर अनलॉक करण्यात आले. व्यापारी संघटनेला विश्वासात घेऊन शहरात मंगळवार व शनिवार जनता कर्फ्यू म्हणून घोषित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनियमभंग केल्यास होणार दंडात्मक कारवाई ठिकठिकाणी बंदोबस्त

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : लॉकडाऊननंतर अटी, शर्तीवर अनलॉक करण्यात आले. व्यापारी संघटनेला विश्वासात घेऊन शहरात मंगळवार व शनिवार जनता कर्फ्यू म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार, २१ जुलै रोजी पहिला जनता कर्फ्यू असेल. या दरम्यान कोणी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक, कठोर कारवाई पालिका प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे. यासाठी सहकार्य करून कोरोनाला पळवून लावण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या सूचनेनुसार ७ ते १३ जुलैपर्यंत सक्तीचे लॉकडाऊनचे सक्तीने पालन केल्यानंतर शहर १४ पासून शहर अटी व शर्तीवर अनलॉक करण्यात आले आहे. बाजारपेठ परिसरातील सहा ठिकाणी नो व्हेईकल झोन म्हणून घोषित करण्यात आले. अनलॉकमध्ये आठवड्यातून दोन दिवस जनता कर्फ्यू करण्यात यावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व प्रशासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्या चर्चेदरम्यान मंगळवार व शनिवार हे दिवस जनता कर्फ्यूचे ठरले. २१ रोजी मंगळवारी पहिला जनता कर्फ्यू पाळण्यासाठी पोलीस प्रशासनासह पालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. २० रोजी सायंकाळी पालिका प्रशासनातर्फे शहरामध्ये जनता कर्फ्यूसंदर्भात उद्घोषणा करण्यात आली.मंगळवारी व्यापाऱ्यांचा आधीपासूनच असतो बंदमंगळवार हा दिवस व्यापारी असोसिएशन संघटनेतर्फे पूर्वीपासूनच बंद ठेवण्यात येतो. यामुळे मंगळवार हा दिवस व्यापाºयांसाठी फारसा जड जाणार नाही. याशिवाय दुसरा दिवस शनिवार जनता कर्फ्यू म्हणून पाळण्यात येणार आहे.नो व्हेईकल झोनसाठी बॅरिकेटिंगलॉकडाऊननंतर शहर अनलॉक झाल्यानंतर बाजारात गर्दी होऊ नये यासाठी जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने आठवडे बाजार, नरसिंह मंदिर, कपडा मार्केट, सराफ बाजार, मॉडल रोड, ब्राह्मण संघ परिसर, मुख्य बाजारपेठेचा भाग ‘नो व्हेईकल झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. याठिकाणी पालिका प्रशासनातर्फे ३५ ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. याशिवाय तीन ठिकाणी मुव्हेबल बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. यात डॉ.आंबेडकर पुतळा, अमर स्टोअरजवळ तसेच भारत मेडिकल बाजारपेठ या ठिकाणी मुव्हेबल बँरीकेटिंग करण्यात आली आहे.मास्क नसल्यास जागेवरच १०० रुपये दंडकोरोना संसर्ग आटोक्यात यावा यासाठी मास्क न वापरणाºया नागरिकांना प्रशासनातर्फे जागेवरच १०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.सोशल मीडियावरही होतेय जनता कर्फ्यूचे आवाहनमहानायक अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या डॉन या भूमिकेतून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. डॉनला पकडणे मुश्किलच नाही तर नामुमकीन होते, त्याच डॉनला कोरोनाने पकडले. आपणही आपल्या परिवारासाठी घरीच थांबा. उगाच डॉन बनून बाजारात फिरू नका, असे सूज्ञ नागरिक सोशल मीडियाद्वारे जनता कर्फ्यू सक्तीने पाळावा याकरिता पोस्ट टाकत आहे.पोलिसांची राहील शहरात गस्तजनता कर्फ्यू दरम्यान कोणीही नियमाचे उल्लंघन करू नये याकरिता नेहमीप्रमाणे पोलीस प्रशासनातर्फे ठिकठिकाणी गस्त घालण्यात येणार आहे. कोणीही नियमाचे उल्लंघन करू नये, असे आवाहन डीवायएसपी गजानन राठोड यांनी जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर भुसावळकरांना केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ