फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या नामविस्तारानिमित्त तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाच्या पुढाकाराने शुक्रवारी कवयित्री बहिणाबाई चौधरी जीवनदर्शन चित्ररथ शोभायात्रा काढण्यात आली. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.पी.पी. पाटील यांनी या चित्ररथाचे उद्घाटन केले. मान्यवरांची भाषणे झाली.विद्यापीठाच्या नामविस्तार सोहळ्याच्या महिना पूर्तीनिमित्त शोभायात्रा माजी आमदार तथा तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शोभायात्रेची सुरुवात कवयित्री बहिणाबाई चौधरी व लोकसेवक मधुकरराव चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजनाने झाली. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी केले. शोभायात्रेचे समन्वयक डॉ.गोपाळ कोल्हे यांनी आभार मानले. या वेळी प्रा.दिलीप रामू पाटील, विद्यापीठ व्यवस्थापन सदस्य, प्रा.नितीन बारी, विद्यापीठ व्यवस्थापन सदस्य, डॉ.अनिल पाटील, सिनेट सदस्य, व फैजपूर नगराध्यक्षा महानंदा होले, मसाका चेअरमन शरद महाजन, व्हाईस चेअरमन भागवत चौधरी जिल्हा दूध संघाचे संचालक हेमराज चौधरी, उपनगराध्यक्ष कलीमखा मन्यार, माजी नगराध्यक्ष मिलिंद वाघुळदे, फैजपूरचे सर्व नगरसेवक, तापी परिसर मंडळाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.सुभाष चौकातून माजी आमदार शिरीष चौधरी , कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील व उपस्थित मान्यवरांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी जीवनदर्शन चित्ररूप शोभायात्रेला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. ही शोभायात्रा-खुशाल भाऊ रोड-पहेडवाडा- जुने म्युनिसिपल हायस्कुल- न्हावी रोड-रथ गल्ली लक्कड पेठ-मोठा मारोती मंदिर असा मार्गक्रमण करीत परत सुभाष चौक येथे आली.कवयित्री बहिणाबाई चित्ररूप शोभायात्रेतील विद्यार्थ्यांना पाणी शरबतची व्यवस्था व्यावसायिक व नागरिकांनी केली होती.यशस्वी आयोजनासाठी तापी परिसर मंडळाचे मा पदाधिकारी, प्राचार्य डॉ पी आर चौधरी, उपप्राचार्य डॉ ए आय भंगाळे, डॉ उदय जगताप, प्रा ए जी सरोदे, प्रा डी बी तायडे समन्वयक डॉ गोपाळ कोल्हे यांनी प्राध्यापक शिक्षककेत्तर कर्मचारी व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले.
बहिणाबार्इंच्या जीवनपटाने फैजपूरवासी भारावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 4:39 PM
शोभायात्रेत बहिणाबार्इंच्या वेषभूषेत विद्यार्थिनींनी केल्या विविध भावमुद्रा
ठळक मुद्देशोभायात्रेत विद्यार्थांनी बहिणाबाई चौधरी यांची कविता असे संसार संसार आधी हाताले चटके, अरे खोप्या मंदी खोपा, देवा घरोट घरोट, अश्या अनेक कविता म्हणत,विद्यार्थांनी लेझीम, वारकरी दिंडीतून येग येग विठाबाई असे अभंग,भुलाबाई च्या टिपऱ्या खेळतांना विद्यार्थी आनंदा१९३६ चे काँंग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन फैजपूरला झाल्याने त्याची प्रतिकृती म्हणून महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, अब्दुल कलाम आझाद, साने गुरुजी, धनाजी नाना चौधरी यांची वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी फैजपूरकरांचे मने जिंकून घेतली.शोभायात्रेत कुसुमताई मधुकरराव चौधरी, लोकसेवक मधुकरराव चौधरी औषध निर्माण महाविद्यालय, शिक्षण शास्त्र महिला महाविद्यालय, डी फॉर्म महाविद्यालयातील सर्व प्राचार्य शिक्षक व शिक्षककेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते.