लोकमत ऑनलाईन पारोळा, दि.4 : शहरानजीक नव्यानेच रहिवास सुरू झालेल्या श्रीनाथजीनगरात शनिवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास फणा काढून उभा ठाकलेला भला मोठा नाग (कोब्रा) एका दुचाकीस्वार रहिवाशाच्या नजरेस पडताच त्याची भितीने गाळण उडाली, त्याने जागेवरच दुचाकी सोडून पळ काढला आणि ही माहिती या भागातील रहिवाशांना दिली. दरम्यान, या नागाला शोधण्यासाठी लोकांची धावपळ झाली, तोर्पयत हा कोब्रा पसार झाला होता, मात्र त्याने निर्माण केलेल्या दहशतीमुळे श्रीनाथजीनगरवासियांनी भितीपोटी का होईना या भागात सामूहिक सफाई मोहीम राबवून परिसर स्वच्छ करून टाकला. श्रीनाथजीनगरात पावसाळ्यात गवत तसेच काटेरी झाडे- झुडपे ब:याच प्रमाणात वाढली असून हा भाग सरीसृप प्राण्यांसाठी रहिवासाचे स्थान झाले आहे. शनिवारी सकाळी आपल्या कामानिमित्त बाहेर पडलेले रहिवासी बाबूराव पाटील यांना किमान 13- 14 फूट लांबीचा हा कोब्रा दिसला. त्याचे भितीदायक दर्शन होताच पाटील यांना भोवळच आली, त्यांनी जागेवरच दुचाकी सोडत पळ काढला. आणि स्वत:ला कसेबसे सावरत वस्तीतील लोकांना आवाज देत हा कोब्रा झुडपात गेल्याचे सांगितले. त्यामुळे या भागातील नागरिक स्त्री- पुरूषांची एकच धावपळ सुरू झाली. कोणी म्हणत होते, सर्पमित्राला बोलवा तर काही जण लाठय़ाकाठय़ा घेऊन कोब्राच्या शोधात निघाले. ज्याने हा कोब्रा पाहिला होता त्याची तर बोलतीच बंद झाली होती. शोधाशोध करूनही कोब्रा सापडला नाही. पण परिसर स्वच्छ करावा असे ठरले आणि श्रीनाथजीनगरात वाढलेली झाडे उपटून टाकण्यासाठी जेसीबी यंत्र आणत तसेच नागरिकांनी हातात फावडे, विळे, कोयते घेत सर्व नगरात स्वखर्चाने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मात्र तो कोब्रा सापडला नाही. या भागात अनेक प्लॉटधारक आहेत. काही घरे बांधली गेली आहेत, तर अनेक वर्षांपासून अनेक प्लॉट रिकामे पडून आहेत. त्यावर गवत, काटेरी झुडपे उगवली आहेत. खूप घाण या प्लॉट भागात जमा झाली आहे. त्या मुळे सर्प, विंचू यांचे वास्तव्य या भागांवर आहे.
पारोळ्यात कोब्राने नागरिकांना लावले स्वखर्चाने सामूहिक सफाई मोहीमेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 7:08 PM
पारोळा शहरातील श्रीनाथजीनगरात वाढलेल्या काटेरी झाडा झुडपांमध्ये सरीसृप वर्गातील प्राण्यांचा वावर वाढला असून शनिवारी एका रहिवाशाला भला मोठा कोब्रा (नाग) दिसल्याने भितीपोटी नागरिकांनी सामूहिक सफाई मोहीम राबविली.
ठळक मुद्देजेसीबी, कुदळ, फावडे घेऊन नागरिक भिडले सफाईलाकोब्रा मात्र पसार होण्यात यशस्वीकोब्राच्या भीतीने नवीन वस्ती झाली साफ