ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.29- सरकार विरोधात जी आंदोलने होतील त्यात शहर व ग्रामीण कार्यकारिणी असा भेद नको. जळगाव शहरात आगामी महापालिका निवडणुकीत सर्व नेत्यांनी जबाबदारी घेतली पाहीजे. प्रत्येक बूथवर एक कार्यकत्र्यासोबत इतर 10 जण असावेत. आगामी जुलै महिन्यात मी एक दिवस जळगाव शहर व एक दिवस ग्रामीण, असा वेळ देऊन आढावा घेईन, संवाद साधेल. सर्वानी एकत्र येऊन काम करावे, आंदोलने करावीत, लोकांना वाटले पाहीजे की आपण एकत्र आहोत, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, नेत्यांसोबत आयोजित बैठकीत दिल्या.
दुपारी अजिंठा विश्रामगृहात ही बैठक झाली. त्यात पवार यांच्यासह माजी खासदार ईश्वरलाल जैन, वसंतराव मोरे, जिल्ह्याचे प्रभारी दिलीप वळसे-पाटील, माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर, जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, अरुण पाटील, मनीष जैन, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, कार्याध्यक्ष विलास पाटील, समन्वयक विकास पवार, महिला आघाडीच्या मंगला पाटील, कल्पना पाटील, मीनल पाटील, राजेंद्र चौधरी, वाल्मीक पाटील आदी उपस्थित होते.